एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार? पोस्ट करुन स्पष्टच सांगितलं…

पुढारी ऑनलाइन डेस्क ; माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढील काळात मोठे राजकीय भूकंप होतील असे बोलले जात आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे देखील भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर एकनाथ खडसे यांनी X पोस्ट करुन खुलासा केला आहे. आगामी लोकसभा … The post एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार? पोस्ट करुन स्पष्टच सांगितलं… appeared first on पुढारी.

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार? पोस्ट करुन स्पष्टच सांगितलं…

Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क ; माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढील काळात मोठे राजकीय भूकंप होतील असे बोलले जात आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे देखील भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर एकनाथ खडसे यांनी X पोस्ट करुन खुलासा केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये बड्या नेत्यांची इनकमिंग सुरु झाली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे येत्या काळात आणखी मोठे मासे भाजपच्या गळाला लागण्याची चिन्ह असून अवघ्या राजकीय वर्तुळात तिच चर्चा सुरु आहे. अशातच भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांच्याही घरवापसीची चर्चा सुरु आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनीच X पोस्ट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की,  गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे. असे खडसे यांनी आपल्या X खात्यावर पोस्ट केले आहे.

गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 13, 2024

गिरीश महाजन काय म्हणाले?
गिरीश महाजन यांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,  एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. पण खडसे यांना पक्षात परत घ्यायचे किंवा नाही यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांकडून मला  विचारणा झालेली नाही. मला वाटतं तसे काही प्रयोजन अद्याप नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. खडसे यांची थेट वरुन काही हॉट लाइन असेल तर त्यांनी लावावी असा टोलाही महाजन यांनी लगावला.
हेही वाचा :

इम्रान खान यांनी केला दाेन प्रांतात सत्ता स्‍थापनेचा दावा
Hinjewad : समाविष्ट गावांच्या घोषणेनंतर चर्चांना उधाण..

Latest Marathi News एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार? पोस्ट करुन स्पष्टच सांगितलं… Brought to You By : Bharat Live News Media.