माझ्याबाबत वावड्या पसरविल्या जात आहेत : विजय वडेट्टीवार

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: एक व्यक्ती गेली म्हणजे पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला, असे समजण्याचे कारण नाही. या परिस्थितीतून काँग्रेस नव्याने उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीने उभा राहील. माझ्या संदर्भात काही वावड्या पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, मी काँग्रेस सोडून जाणार नाही, असे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. Vijay Wadettiwar
मला काँग्रेस पक्षाने खूप काही दिले आहे. आता मला फार काही अपेक्षा नाहीत. शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याचा निर्धार मी केलेला आहे.राज्यसभा निवडणूक संदर्भात महाराष्ट्राचे प्रभारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भातील चर्चा पुढे येईल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. Vijay Wadettiwar
मुंबईची इंडिया आघाडीची बैठक असेल, नागपूरला असलेली काँग्रेसची सभा असो, आम्ही खांद्यावर जबाबदारी घेऊन काम केलेले आहे. मात्र, अशोक चव्हाण यांच्यामागे केंद्रीय एजन्सीचा ससेमिरा लावण्याचे काम सुरू झाले होते. हे सत्य नाकारून चालत नाही. भाजप 400 के पारचा नारा देत असताना दुसऱ्यांचे नेते का पळवत आहे? यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही. अशी परिस्थिती सध्या देशात आहे.
प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण झाले. पण त्यातून काही साध्य झाले नाही.
मात्र, दुसऱ्यांचे नेते पळवून घर सजवण्याचे काम ते करत आहेत. परंतु, ते लोकांना मान्य होणार नाही.असा दावा वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेनिथल्ला यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होत आहे. त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलावले आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यासह विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच लोणावळा येथे १६ आणि १७ फेब्रुवारीला पक्षाची बैठक आहे. राजकारणात पक्षात बदल होत असतात, लोक जात असतात, असेही ते म्हणाले.
हेही वाचा
Ashok Chavan join BJP : अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेशासाठी किती शुल्क दिले?
Ashok Chavan in BJP: ‘पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन…’- भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
Congress Press : ‘पक्ष’बदलूंना लोक स्वीकारणार नाहीत : काँग्रेसचा अशोक चव्हाणांवर घणाघात
Latest Marathi News माझ्याबाबत वावड्या पसरविल्या जात आहेत : विजय वडेट्टीवार Brought to You By : Bharat Live News Media.
