पुणे : ‘टीईटी’ आता ऑनलाईनच!
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाईन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी यापुढे ऑनलाईन घेण्यात येणार आहे. राज्यात नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात संबंधित ऑनलाईन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. आयबीपीएस या कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकार्यांनी दिली.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दर वर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती. गेल्या दोन वर्षांत टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
तर, अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी, तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सिटीईटी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची टीईटी देखील ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी संबंधित परीक्षा देणारे उमेदवार करीत होते. त्यानुसार आता परीक्षा परिषदेने परीक्षा ऑनलाईन घेण्याचे निश्चित केले आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने आधीपासूनच तयारी सुरू करावी लागते.
परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेश पत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो. जानेवारी महिन्यात सिटीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच केंद्रप्रमुख पदाची परीक्षादेखील घेण्यात येणार आहे. त्यामुळे आयबीपीएस या कंपनीला परीक्षेची तयारी करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता टीईटी फेब—ुवारी महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठीचे वेळापत्रक आणि अन्य बाबी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात स्पष्ट करण्यात येणार आहेत. परंतु, यापुढे टीईटी ऑनलाईनच घेण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले.
काय आहेत ऑनलाईन परीक्षेचे फायदे..
टीईटी वेळेत घेऊन निकाल लवकर जाहीर करण्यास होणार मदत
परीक्षेतील गैरप्रकारांना पूर्ण आळा बसणार
परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा वापर कमी होणार
परीक्षा पारदर्शक होण्यास मदत होणार
ऑफलाईन परीक्षेत होत असलेल्या चुका टाळण्यास होणार मदत
राज्य परीक्षा परिषदेकडून सध्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यावर भर आहे. तसेच राज्य सरकारकडून देखील टीईटी ऑनलाईन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील टीईटी ऑनलाईनच घेण्याचे नियोजन झाले आहे. त्यासाठी बैठका, तसेच पत्रव्यवहार सुरू असून, आयबीपीएस या कंपनीमार्फत टीईटी फेब—ुवारी महिन्यात घेण्याचे प्रस्तावित आहे. परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम यांसह अन्य बाबी लवकरच जाहीर केल्या जातील.
– डॉ. नंदकुमार बेडसे,
अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद
हेही वाचा
Weather Update : राज्यात आगामी पाच दिवस पावसाचे
पुन्हा हुलकावणी!
सिंधुदुर्ग : आंबा, काजू पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात
The post पुणे : ‘टीईटी’ आता ऑनलाईनच! appeared first on पुढारी.
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाईन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी यापुढे ऑनलाईन घेण्यात येणार आहे. राज्यात नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात संबंधित ऑनलाईन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. आयबीपीएस या कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकार्यांनी दिली. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये …
The post पुणे : ‘टीईटी’ आता ऑनलाईनच! appeared first on पुढारी.