
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने काय नाही दिलं. त्यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले; पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशा पक्ष बदलूंना लोक स्वीकारणार नाही, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज (दि. १३) केला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला बोलत होते. (Congress Press)
या वेळी रमेश चेन्नीथ म्हणाले, ईडी दबावामुळे अनेकजण भाजपात गेले आहेत. काँग्रेस का सोडली यांचे उत्तर चव्हाणांकडे नाही. काँग्रेस एकजूट होऊन काम करेल, आता कोणीही भाजपात जाणार नाही. तसेच चव्हाणांसोबत कोणीही जाणार नाही, असे देखील काँग्रेस प्रभारी चेन्निथला यांनी स्पष्ट केले. भाजपात गेल्यावर सर्व भ्रष्टाचारी कसे साफ होतात, असा सवाल देखील त्यांनी पत्रकार परिषदवेळी केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी. उपस्थित होते. (Congress Press)
Congress Press: मैदान सोडणाऱ्यांना जनता दाखवेल
अशोक चव्हाणांनी सांगावे पार्टीने त्यांच्यावर काय अन्याय केला आहे? ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप ते भाजपात गेले. ईडी, सीबीआयमुळे लोक पक्ष सोडतायत. पण मैदान सोडणाऱ्यांना जनता दाखवेल, असे आव्हानही महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्ष सोडणाऱ्यांना केले आहे. (Congress Press)
चव्हाणांनी परत यावं- पटोलेंनी केली विनंती
अशोक चव्हाण यांना नेतृत्व करण्याची सवय आहे. त्यांना भाजपात अशी संधी त्यांना मिळणार नाही. अजून संधी गेली नाही, अशोक चव्हाण यांनी अजून परत यावे, अशी विनंती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशामध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसेच अशोक चव्हाण यांना आम्हीच भाजपात पाठवले असा दावाही त्यांनी केला.
A meeting of Maharashtra Congress leaders chaired by party leader Ramesh Chennithala after former Maharashtra CM Ashok Chavan joined BJP today. pic.twitter.com/a8frcEE1If
— ANI (@ANI) February 13, 2024
LIVE: पत्रकार परिषद, मुंबई https://t.co/wIiAMOna1o
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 13, 2024
हेही वाचा:
बंड शंकररावांचे, विलासरावांचे आणि अशोकरावांचे ….
“मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष…” भाजप प्रवेशावेळी अशोक चव्हाणांची ‘स्लिप ऑफ टंग’!
Devendra Fadnavis : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीची ताकद वाढणार : फडणवीस
Latest Marathi News ‘पक्ष’बदलूंना लोक स्वीकारणार नाहीत : काँग्रेसचा अशोक चव्हाणांवर घणाघात Brought to You By : Bharat Live News Media.
