कांदा पिकासाठी शास्त्रोक्त पद्धत वापरा : डॉ. विजय महाजन

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍यांनी कांदा उत्पादनवाढीसाठी शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन कांदा व लसूण संशोधन संचलनालयाचे डॉ. विजय महाजन यांनी केले. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रात ’ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव 2024’अंतर्गत आयोजित परिसंवादात ते बोलत होते. या वेळी प्रगतशील शेतकरी विक्रम अवचट, ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह अरविंद मेहेर, संचालक एकनाथ शेटे, … The post कांदा पिकासाठी शास्त्रोक्त पद्धत वापरा : डॉ. विजय महाजन appeared first on पुढारी.

कांदा पिकासाठी शास्त्रोक्त पद्धत वापरा : डॉ. विजय महाजन

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा :  शेतकर्‍यांनी कांदा उत्पादनवाढीसाठी शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन कांदा व लसूण संशोधन संचलनालयाचे डॉ. विजय महाजन यांनी केले. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रात ’ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव 2024’अंतर्गत आयोजित परिसंवादात ते बोलत होते. या वेळी प्रगतशील शेतकरी विक्रम अवचट, ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह अरविंद मेहेर, संचालक एकनाथ शेटे, देविदास भुजबळ, गोपीनाथ दिवेकर आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. महाजन यांनी गादी वाफ्यावर रोपांची निर्मिती करण्याचा, उत्पादन खर्च कमी करण्याचा, संतुलित खतांचा वापर करण्याचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा मल्चिंगचा उपयोग करण्याचा सल्ला दिला.
बांधावरचे गवत काढून टाकल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. गोपीनाथ दिवेकर यांनी टोमॅटो लागवड, मल्चिंग पपेर वापर, विषाणुजन्य रोगांपासून वाचण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब फायदेशीर राहील, असे सांगितले. या चर्चासत्रात कांदा व टोमॅटो उत्पादनातील लागवडीची योग्य वेळ, रोपे लावणीची पद्धत, खत व्यवस्थापन, रोग आणि किडींचे नियंत्रण आणि काढणी आणि साठवण, यांसारख्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.
चर्चासत्रात शेतकर्‍यांनी कांदा व टोमॅटो उत्पादनात येणार्‍या अडचणींवर प्रश्न विचारले आणि त्यावर डॉ. महाजन आणि दिवेकर यांनी मार्गदर्शन केले. यामुळे शेतकर्‍यांना कांदा व टोमॅटो उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेली माहिती मिळाली आणि त्यांना शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करण्यास प्रेरणा मिळाली. प्रास्ताविक भारत टेमकर यांनी केले. सुनील ढवले यांनी आभार मानले.
 
 
Latest Marathi News कांदा पिकासाठी शास्त्रोक्त पद्धत वापरा : डॉ. विजय महाजन Brought to You By : Bharat Live News Media.