जळगाव : माजी नगरसेवकाच्या खून प्रकरणातील दोघांना अटक

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा- चाळीसगाव येथील भाजपा नगरसेवक महेंद्र उर्फ बाळा मोरे यांच्यावर त्यांच्या कार्यालयात जाऊन गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणातील दोघांना गुन्हे शाखेने लोणीकंद (पुणे) येथून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील भाजपा नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर (दि.7) रोजी सायंकाळी त्यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी गोळीबार केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा नाशिक येथे मृत्यू झाला. आरोपींच्या शोधात पोलिसांच्या पाच तुकड्या रवाना झाल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील हे आरोपीच्या शोधासाठी अहमदनगर व पुणे येथे गोपनीय माहितीच्या आधारे गेले होते. संशयित आरोपी सचिन सोमनाथ गायकवाड व अनिस उर्फ नव्वा शेख शरीफ शेख हे पुणे परिसरातील लोणीकंद येथे असल्याच्या माहितीवरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी दिली
Latest Marathi News जळगाव : माजी नगरसेवकाच्या खून प्रकरणातील दोघांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.
