काटेपुरम चौक येथील स्थिती; वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त

नवी सांगवी : महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत सुसज्ज रस्ते, पदपथ, स्ट्रीट लाईट, चौक सुशोभीकरण आदी नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात केल्याने येथील परिसराची स्मार्ट परिसर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मात्र, काही व्यावसायिकांनी रस्त्यावर टाकलेल्या राडारोड्यामुळे परिसराला दिवसेंदिवस बाधा निर्माण होत आहे. वाहतुकीला अडथळा काटेपुरम चौक येथील मयूरनगरी सोसायटीच्या रस्त्यालगत अनधिकृत बांधकामाचा राडारोडा गेली काही दिवस … The post काटेपुरम चौक येथील स्थिती; वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त appeared first on पुढारी.

काटेपुरम चौक येथील स्थिती; वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त

नवी सांगवी : महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत सुसज्ज रस्ते, पदपथ, स्ट्रीट लाईट, चौक सुशोभीकरण आदी नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात केल्याने येथील परिसराची स्मार्ट परिसर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मात्र, काही व्यावसायिकांनी रस्त्यावर टाकलेल्या राडारोड्यामुळे परिसराला दिवसेंदिवस बाधा निर्माण होत आहे.
वाहतुकीला अडथळा
काटेपुरम चौक येथील मयूरनगरी सोसायटीच्या रस्त्यालगत अनधिकृत बांधकामाचा राडारोडा गेली काही दिवस रस्त्याच्याकडेला पसरत असल्याने वाहतुकीला तसेच वाहन पार्क करणार्‍यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील परिसरात उच्चभ्रू नागरिक वास्तव्य करीत असल्याने येथील रस्त्यावरून पायी ये-जा करताना राडारोड्याचा अडथळा निर्माण होत आहे. या वेळी मुख्य रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
कारवाईकडे दुर्लक्ष
एरवी महापालिकेचे अतिक्रमण विभाग रस्त्यावर राडारोडा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून समज देत असते. परंतु, गेली महिना येथील राडारोडा रस्त्यावर पसरत असताना पाहूनदेखील कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनादेखील दररोज स्वच्छ्ता करताना याचा नाहक त्रास होत आहे.
राडारोडा हटविण्याची मागणी
अशा तर्‍हेने बांधकाम करीत असताना रस्त्यावर वाळू, खडीचे ढिगारे, फरशा, विटा आदी साहित्य सामग्री रस्त्याच्याकडेला गेली काही दिवस पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी सारख्या येथील परिसराचा बकालपणा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पहावयास मिळत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित रस्त्याच्याकडेला पडलेला राडारोडा हटविण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक तसेच व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत सोसायटीकडून तक्रार आली आहे. संबंधित विभागाला त्वरित माहिती देऊन तेथील पाहणी करण्यास सांगितले जाईल. राडारोडा आढळून आल्यास तो काढून टाकण्यात येईल. तसेच, रस्त्यावर राडारोडा टाकून बांधकाम करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील.
– उमेश ढाकणे, ह क्षेत्रीय अधिकारी
सोसायटीची परवानगी न घेता व्यावसायिक, गाळाधारक अनधिकृत बांधकाम करून रस्त्यावर राडारोडा टाकत असल्याने क्षेत्रीय अधिकार्‍यांना फेडरेशनकडून तक्रार केली आहे. वेळोवेळी गाळा मालकाला सांगूनही ऐकूण घेण्याची भूमिका घेत नाही.
– शंकर गायकवाड, सचिव, मयूरनगरी फेडरेशन कमिटी
पाहणी करून राडारोडा आढळून आल्यास संबंधित व्यक्तीला कायदेशीर नोटीस देण्यात येइल. संबंधित व्यक्तीने राडारोडा न हटविल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– धनश्री जगदाळे, आरोग्य निरीक्षक, प्रभाग 31

हेही वाचा

Pimpri : बड्या नेत्यांची वेळ मिळत नसल्याने प्रकल्प धूळखात..
दौंडच्या वनपरिक्षेत्र आधिकारी कल्याणी गोडसे निलंबित
पणजी ; ४ वर्षीय मुलीला तरूणाने पळवले; डोक्‍यात दगड घातला, जखमी मुलगी रात्रभर राहिली जंगलात

Latest Marathi News काटेपुरम चौक येथील स्थिती; वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त Brought to You By : Bharat Live News Media.