शेतकरी आंदाेलन : ट्रॅक्टरने सिमेंट ‘बॅरिकेड्स’ तोडण्याचा प्रयत्न

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि इतर मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांचा मोर्चा आज (दि.१३) दिल्लीत धडकणार आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनीही त्यांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. तसेच शेकडो शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. ( Farmers forcibly … The post शेतकरी आंदाेलन : ट्रॅक्टरने सिमेंट ‘बॅरिकेड्स’ तोडण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.
शेतकरी आंदाेलन : ट्रॅक्टरने सिमेंट ‘बॅरिकेड्स’ तोडण्याचा प्रयत्न

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि इतर मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांचा मोर्चा आज (दि.१३) दिल्लीत धडकणार आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनीही त्यांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. तसेच शेकडो शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. ( Farmers forcibly remove the cement barricade with their tractors )
पंजाब पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना राजपुरा बायपास ओलांडण्याची परवानगी दिली जेव्हा ते हरियाणाच्या अंबालाकडे दिल्लीकडे जात असताना त्यांच्या मागण्यांसाठी दबाव आणला. तथापि, पंजाब-हरियाणा शंभू सीमेवर तणाव वाढला असून, शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने सिमेंट बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ड्रोनचा वापर करून अश्रुधुराचे काही गोळे टाकण्यात आले. असे वृत्त ‘एएनआय’ ने दिले आहे. ( Farmers forcibly remove the cement barricade with their tractors )
तिन्ही सीमांवर प्रचंड बंदोबस्त
दिल्लीत प्रवेश करणार्‍या तिन्ही प्रमुख रस्त्यांवर दिल्ली पोलिस व निमलष्करी दलाच्या तुकड्या मोठ्या संख्येने तैनात करण्यात आल्या आहे. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर येथे रस्त्यांवर अडथळे उभारण्यात आले असून तेथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय हरियाणातून येणारे काही छोटे रस्तेही बंद करण्यात आले आहेत.
कंटेनर, जेसीबी, सिमेंट ब्लॉक्स
दिल्लीचे एन्ट्री पॉईंट समजल्या जाणार्‍या सार्‍या सीमांवर शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर रोखण्यासाठी जागोजागी रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. सिमेंटचे मोठमोठे ब्लॉक्स आणून रस्ते रोखण्यात आले आहेत. जेसीबी व कंटेनर आणूनही रस्त्यावर जणू तटबंदी उभारण्यात आली आहे.
जमावबंदी लागू
13 फेब्रुवारीच्या शेतकर्‍यांच्या दिल्ली चलो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी जमावबंदीसोबतच वाहतुकीसंबंधांतील सविस्तर सूचना जारी केल्या असून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

#WATCH | Protesting farmers forcibly remove the cement barricade with their tractors as they try to cross over the Haryana-Punjab Shambhu border. pic.twitter.com/gIyGNy8wsi
— ANI (@ANI) February 13, 2024

हेही वाचा : 

संसद मार्च : शेतकरी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या चिंतेत वाढ!
‘अग्‍निपथ’ विरोधात राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्‍त्र, “कृषी कायद्याप्रमाणे ही याेजना…”
किसान पंचायत : कृषी कायदे रद्द करण्यासाठी जंतर मंतरवर आंदाेलन

 
 
Latest Marathi News शेतकरी आंदाेलन : ट्रॅक्टरने सिमेंट ‘बॅरिकेड्स’ तोडण्याचा प्रयत्न Brought to You By : Bharat Live News Media.