पणजी ; ४ वर्षीय मुलीला डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर एका (४ वर्षीय) निरागस मुलीला शेजारी राहणाऱ्या तरुणाने पळवून नेऊन तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही अंगावर शहारे आणणारी घटना गोव्यात समोर आली आहे. सत्तरी तालुक्यातील मोर्ले येथे चार वर्षांच्या मुलीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली वाळपई पोलिसांनी गोलू ठाकूर (वय २८) याला अटक केली आहे.
मोर्लेतील चिरेखाणीवर काम करणारे परप्रांती मजूर राहात असलेल्या वस्तीतील एक चार वर्षीय मुलगी काल (सोमवार) रात्रीपासून बेपत्ता होती. तिचे आईवडील मजुरी करून घरी आल्यानंतर त्यांना मुलगी कुठेच दिसली नाही. त्यामुळे त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. शेवटी वाळपई पोलीस स्थानकात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या वस्तीतील लोकांची चौकशी केली व मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या पाच तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवला. त्यानंतर यातील एकाने सदर मुलीला आपण तिच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले.
संशयित गोलू ठाकूर याने दिलेल्या माहितीप्रमाणे काल (सोमवार) रात्री ८ ते उत्तररात्री ३ वाजेपर्यंत पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. पण, कुठेही पत्ता लागला नाही. संशयित पोलिसांची दिशाभूल करत होता. ३ वाजता पोलिसांनी शोधमोहीम थांबवली आणि आज पहाटे पुन्हा शोध मोहीम चालू केली असताना मुलगी डोंगरमाथ्यावरील एका काजूच्या झाडाखाली जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्या डोक्यावर जखम झाली असून पहिल्यांदा साखळी आरोग्य केंद्रात तिच्यावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. यानंतर तिला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, संशयित गोलू याने तिचा खून करण्याचा प्रयत्न का केला त्याचा शोध पोलीस घेत आहेत. संशयित व मुलीचे पालकही परप्रांतीय आहेत.
हेही वाचा :
Abhishek Ghosalkar : माझ्या मुलीने बाप गमावला, तितकेच वाईट घोसाळकरांच्या मुलाचे वाटते; मॉरिसच्या पत्नीची भावना
Ashok Chavan Join BJP : अखेर अशोक चव्हाण भाजपवासी! फडणवीसांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश
Mithun Chakraborty ना रुग्णालयातून डिस्चार्ज, पीएम नरेंद्र मोदींनी फटकारल्यानंतर…
Latest Marathi News पणजी ; ४ वर्षीय मुलीला डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न Brought to You By : Bharat Live News Media.
