अशोक चव्हाण यांचा ‘भाजप’मध्ये अधिकृतरित्या प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल (दि.१२) काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज (दि.१३) दुसऱ्याच दिवशी भाजपसोबत नवीन राजकीय कारकिर्दीला सुरूवात करणार असल्याचे म्हटले होते. यानुसार अशोक चव्हाण भाजप कार्यालयात आज अधिकृतपणे पक्षप्रवेश केला आहे. यावेळी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील अशोक … The post अशोक चव्हाण यांचा ‘भाजप’मध्ये अधिकृतरित्या प्रवेश appeared first on पुढारी.
अशोक चव्हाण यांचा ‘भाजप’मध्ये अधिकृतरित्या प्रवेश

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल (दि.१२) काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज (दि.१३) दुसऱ्याच दिवशी भाजपसोबत नवीन राजकीय कारकिर्दीला सुरूवात करणार असल्याचे म्हटले होते. यानुसार अशोक चव्हाण भाजप कार्यालयात आज अधिकृतपणे पक्षप्रवेश केला आहे. यावेळी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाला उपस्थित होते. (Ashok Chavan Join BJP)
काँग्रेसला रामराम केल्यानंतर पुढील ४८ तासात आपण आपली राजकीय वाटचाल स्पष्ट करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केले होते.  सोमवारी राजीनामा दिल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली राजकीय वाटचाल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. (Ashok Chavan Join BJP)

LIVE |📍 मुंबई | माध्यमांशी संवाद (13-02-2024) https://t.co/bm7AlBmeHe
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 13, 2024

Ashok Chavan Join BJP: मी आज भाजपमध्ये प्रवेश करतोय
“आज माझ्या राजकीय कारकिर्दीची एक नवीन सुरुवात आहे. मी आज त्यांच्या कार्यालयात औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश करत आहे,” अशी घोषणा काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण यांनी यापूर्वी ‘एएनआय’शी बोलताना केली होती. यानुसार त्यांनी आज मी १२-१२.३० च्या सुमारास माझ्या राजकीय कारकिर्दीचा एक नवीन प्रवास सुरू करणार आहे, मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्‍याचेही स्पष्ट केले होते.  तसेच महाराष्ट्राच्या रचनात्मक विकासासाठी आम्ही काम करू अशी मला आशा आहे, असे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. यानंतर त्यांनी भाजप कार्यालयात अधिकृतपणे पक्षप्रवेश केला आहे.

#WATCH | Mumbai: Former Maharashtra CM Ashok Chavan says, “Today it’s a new beginning of my political career. I am formally joining the BJP in their office today…I am hopeful that we will work for the constructive development of Maharashtra.” pic.twitter.com/tU9PqiV5js
— ANI (@ANI) February 13, 2024

हेही वाचा:

शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाला दिले सुप्रीम कोर्टात आव्‍हान
Sanjay Raut on Ashok Chavan | मुख्यमंत्री शिंदेंसोबत चव्हाणही पक्ष सोडणार होते- राऊतांचा मोठा खुलासा
Congress Party News: मी कॉंग्रेस सोडून कुठेही जाणार नाही; आमदार सहषराम कोरोटे यांचे स्पष्टीकरण 

Latest Marathi News अशोक चव्हाण यांचा ‘भाजप’मध्ये अधिकृतरित्या प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.