Pune : खोडदला चोरट्यांनी केला महिलेचा खून
नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : खोडद (ता. जुन्नर) येथील घनवट मळ्यातील सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे (वय 70) या महिलेचा चोरट्यांनी सोमवारी(दि. 12) दुपारी खून करत त्यांच्या गळ्यातील दागिने लंपास केले. नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टेमगिरे या घरी एकट्याच असतात. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यानी त्यांच्या घरात प्रवेश करून धारदार हत्यारे त्यांचा खून केला. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने लंपास केले. या बाबत सुलोचना टेमगिरे यांचा मुलगा भरत टेमगिरे म्हणाला की, आई एकटीच घरी होती. तिच्या मानेवर वार करत चोरट्यांनी दागिने लंपास केले.
तसेच लोखंडी कपाटातील कपडे इतरत्र फेकून दिले. तसेच दुचाकी घरापासून दूर नेऊन टाकून दिली. शेजारच्या लोकांनी तुमची दुचाकी शेताच्या कडेला टाकण्यात आल्याचे सांगितल्याने घरी गेलो. तेव्हा हा प्रकार उघड झाला. आईला नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शेलार यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
Latest Marathi News Pune : खोडदला चोरट्यांनी केला महिलेचा खून Brought to You By : Bharat Live News Media.