MCX मार्केट सकाळी ९ वाजता उघडलेच नाही, नेमकं काय झालं?

Bharat Live News Media ऑनलाईन : काही तांत्रिक बिघाडांमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर आज मंगळवारी (दि. १३ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता व्यवहार सुरु झाले नाहीत. त्यानंतर सकाळी १० वाजता व्यवहार सुरु होईल असे सांगण्यात आले होते. पण आता कमोडिटी मार्केट्स उघडण्यास आणखी विलंब झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्याऐवजी कमोडिटी मार्केट्स सकाळी ११ पर्यंत उघडेल, असे वृत्त CNBC ने दिले आहे. टेक टीम या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Zerodha आणि Upstox ने त्यांच्या X हँडलवर कळवले होते की तांत्रिक बिघाडामुळे MCX उघडण्यास उशीर होईल. दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) कडून प्राप्त झालेल्या ताज्या अपडेटनुसार, कमोडिटी मार्केट दुपारी १ वाजता उघडणे अपेक्षित आहे.
Update: As per the latest update received from Multi Commodity Exchange (MCX), the commodity markets are expected to open at 1 PM. https://t.co/x3LURAmqsq
— Zerodha (@zerodhaonline) February 13, 2024
Latest Marathi News MCX मार्केट सकाळी ९ वाजता उघडलेच नाही, नेमकं काय झालं? Brought to You By : Bharat Live News Media.
