कर्नाटकचा हापूस आंबा मार्केट यार्डातच; तुमकूर जिल्ह्यातून 47 पेट्या बाजारात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरीपाठोपाठ कर्नाटकातूनही आवक सुरू झाली आहे. रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात कर्नाटकातून टुमकूर जिल्ह्यातून 4 ते 5 डझनाच्या 47 पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या. फळबाजारा तील डी. बी. उरसळ अँड सन्स यांच्या पेढीवर ही आवक झाली. घाऊक बाजारात पेटीला 1800 ते 2200 रुपये भाव मिळाला. … The post कर्नाटकचा हापूस आंबा मार्केट यार्डातच; तुमकूर जिल्ह्यातून 47 पेट्या बाजारात appeared first on पुढारी.

कर्नाटकचा हापूस आंबा मार्केट यार्डातच; तुमकूर जिल्ह्यातून 47 पेट्या बाजारात

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरीपाठोपाठ कर्नाटकातूनही आवक सुरू झाली आहे. रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात कर्नाटकातून टुमकूर जिल्ह्यातून 4 ते 5 डझनाच्या 47 पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या. फळबाजारा तील डी. बी. उरसळ अँड सन्स यांच्या पेढीवर ही आवक झाली. घाऊक बाजारात पेटीला 1800 ते 2200 रुपये भाव मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मा भाव मिळाला आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कर्नाटक हापूसची आवक होत असते. त्याप्रमाणे यंदाही झाली आहे. बंगळुरू जवळील टुमकुर भागातून ही आवक झाली. कर्नाटक बदाम आणि लालबागची आवक यापूर्वीच सुरू झाली आहे. दोन्ही आंब्यांना घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार 70 ते 100 रुपये भाव मिळत आहे. पोषक वातावरणामुळे यंदा कोकणासह कर्नाटक हापूसच्या आंब्याचे उत्पादन जास्त होणार आहे. त्यामुळे तुलनेने कमी भाव मिळत आहे. बाजारात कोकणातील हापूसची दररोज 50 ते 100 पेटी आवक सुरू आहे. आठ ते दहा दिवसांत कर्नाटकचीही तुरळक आवक सुरू होणार आहे. जूनपर्यंत हंगाम सुरू राहणार आहे. कर्नाटक हापूस खाणारा एक वर्ग आहे. तो या आंब्याची वाट पाहत असतो. त्यात तुलनेने कोकण हापूसपेक्षा भाव कमी असल्याचे सतीश उरसळ यांनी नमूद केले.
पोषक वातावरणामुळे यंदा आंब्याचे उत्पादन जास्त राहण्याची शक्यता आहे. यंदा हंगाम नेहमीच्या तुलनेत 15 दिवस आधीच सुरू होणार आहे. कर्नाटक हापूसला यंदा मिळालेला भाव आतापर्यंतचा नीच्चांकी आहे.
– रोहन उरसळ, कर्नाटक आंब्याचे व्यापारी
यंदा कर्नाटक आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहील. तसेच, दरही कमी राहण्याची शक्यता आहे. फेब—ुवारी अखेरपासून बाजारात आंब्याची नियमित आवक सुरू होईल.
– जुनेद शेख, कर्नाटक आंब्याचे व्यापारी

हेही वाचा

जेसीबी’चे खरे नाव काय? रंग पिवळाच का असतो?
Farmers March to Delhi | शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा सील, कडक सुरक्षा तैनात
Nashik | गोदा आरती करण्याचा अधिकार पुरोहित संघाचाच

Latest Marathi News कर्नाटकचा हापूस आंबा मार्केट यार्डातच; तुमकूर जिल्ह्यातून 47 पेट्या बाजारात Brought to You By : Bharat Live News Media.