‘बेन्नू’ लघुग्रहावर पाण्याचा अंश

वॉशिंग्टन : ‘नासा’ने काही महिन्यांपूर्वीच ‘बेन्नू’ नावाच्या लघुग्रहावरून तेथील खडक-मातीचे नमुने पृथ्वीवर आणले आहेत. आता या नमुन्यांचा अभ्यास सुरू असून, त्यामधून या लघुग्रहाबाबतच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. ‘ओसिरिस-रेक्स’ या मोहिमेत हे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये पाण्याचा अंशही असल्याचे दिसून आले आहे. सात वर्षांच्या दीर्घ परतीच्या प्रवासानंतर ‘ओसिरिस-रेक्स’ हे यान 24 सप्टेंबर … The post ‘बेन्नू’ लघुग्रहावर पाण्याचा अंश appeared first on पुढारी.

‘बेन्नू’ लघुग्रहावर पाण्याचा अंश

वॉशिंग्टन : ‘नासा’ने काही महिन्यांपूर्वीच ‘बेन्नू’ नावाच्या लघुग्रहावरून तेथील खडक-मातीचे नमुने पृथ्वीवर आणले आहेत. आता या नमुन्यांचा अभ्यास सुरू असून, त्यामधून या लघुग्रहाबाबतच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. ‘ओसिरिस-रेक्स’ या मोहिमेत हे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये पाण्याचा अंशही असल्याचे दिसून आले आहे.
सात वर्षांच्या दीर्घ परतीच्या प्रवासानंतर ‘ओसिरिस-रेक्स’ हे यान 24 सप्टेंबर 2023 मध्ये अमेरिकेच्या उटाहमध्ये उतरले होते. ‘बेन्नू’ लघुग्रहावर जाऊन त्याच्या पृष्ठभागावर उतरून या यानाने नमुने गोळा केले होते. या नमुन्यांच्या अभ्यासातून 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सौरमालिका कशी बनली याची माहिती यामधून समोर येऊ शकते, असे संशोधकांना वाटते. अरिझोना युनिव्हर्सिटीच्या क्युपर-अरिझोना प्रयोगशाळेतील संशोधक या नमुन्यांचा अगदी अणूंच्या स्तरापर्यंत अभ्यास करीत आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात अरिझोना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना विश्लेषणासाठी ‘बेन्नू’च्या नमुन्यांपैकी 200 मिलिग्रॅम नमुने मिळालेले आहेत. संशोधक डांटे लॉरेटा यांनी सांगितले की, आमच्याकडे या नमुन्यांमधील एक हजारपेक्षा अधिक कण आहेत जे अर्धा मिलिमीटरपेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. 28 कण एक सेंटिमीटरपेक्षा मोठे आहेत. सर्वात मोठा कण 3.5 सेंटिमीटरचा आहे. या नमुन्यांमधील खनिजांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अंश आहे. हे नमुने कार्बन, नायट्रोजन, सल्फर आणि फॉस्फरसनेही संपन्न आहेत.
Latest Marathi News ‘बेन्नू’ लघुग्रहावर पाण्याचा अंश Brought to You By : Bharat Live News Media.