जनता गद्दारांना थारा देणार नाही : यशोमती ठाकूर

अमरावती : अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडले आहे; मात्र भाजपाने कितीही प्रयत्न केले, दबाव टाकून नेत्यांना ओढण्याचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्रातील जनता मात्र भाजप आणि अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही, असे विधान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर यांनी केले आहे. स्वतःच्या पक्षाची ताकद आणि प्रतिमा … The post जनता गद्दारांना थारा देणार नाही : यशोमती ठाकूर appeared first on पुढारी.

जनता गद्दारांना थारा देणार नाही : यशोमती ठाकूर

अमरावती : अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडले आहे; मात्र भाजपाने कितीही प्रयत्न केले, दबाव टाकून नेत्यांना ओढण्याचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्रातील जनता मात्र भाजप आणि अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही, असे विधान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
स्वतःच्या पक्षाची ताकद आणि प्रतिमा दोन्ही उतरणीला लागल्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचे डाव खेळत आहे. काही समस्यांमध्ये अथवा प्रकरणांमध्ये अडकलेल्या काही आदर्श नेत्यांना दबाव टाकून अथवा ईडी, सीबीआय या यंत्रणांची भीती दाखवून भारतीय जनता पार्टी निश्चितच आपल्याकडे घेऊ शकते, अशी टीका त्यांनी केली.
Latest Marathi News जनता गद्दारांना थारा देणार नाही : यशोमती ठाकूर Brought to You By : Bharat Live News Media.