Pune Crime news : लष्करात असल्याचे सांगून फसवणूक

Pune Crime news : लष्करात असल्याचे सांगून फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लष्करात नोकरीला असल्याचे सांगून खासगी व्यक्तीला मिलेट्रीच्या परिसरात येण्यास मज्जाव असल्याचे सांगत 1 लाख 23 हजारांच्या फर्निचरचा अपहार केल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ चव्हाण (रा. आयप्पा वळ, घोरपडी गाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मकरंद कलिंदर पवार (46, रा. गुरुकृपा बंगलो, विद्यानगर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 7 ऑगस्ट रोजी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे पुलगेट येथील सोलापूर बाजार येथील लालको इंटेरिअर्समध्ये नोकरीस आहे. आरोपीने लष्करात नोकरीस असल्याचे सांगत फर्निचर पसंत केले. तसेच मोबाईलवर 1 लाख 23 हजार 869 रुपयांचे एनएफटी केल्याचे स्क्रिनशॉट पवार यांना दाखविले. तसेच 10 हजार जास्त पाठविल्याचे पवार यांना सांगून ते परत मागितले. प्रत्यक्षात त्याने पैसे पाठवलेच नाहीत. तसेच पसंत केलेले सामान पत्नीची प्रसूती झाल्याचे सांगून अर्जंट पाहिजे आहे, अशी विनंती केली. पवार यांना खासगी वाहन
मिलिट्री एरियामध्ये येऊ देत नाही, असे सांगून आरोपीने त्याच्या स्वत:च्या वाहनामध्ये सामान नेले. यादरम्यान, पवार याने आरोपीला सामानाचे पैसे जमा न झाल्याबाबत फोन केला असता आरोपीने मी गाडी चालवत आहे. तपासून तुम्हाला फोन करतो, असे कळविले. याबाबत पवार यांनी वारंवार आरोपीला फोन लावला परंतु त्याचा फोन स्वीचऑफ आल्याने पवार यांनी लष्कर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.
हेही वाचा :

दिल्लीत 7 वर्षांनंतर नागरिकांनी घेतला चांगल्या हवेत श्वास
पुणे : समाविष्ट गावांतील जीएसटीच्या उत्पन्नापासून महापालिका वंचित

The post Pune Crime news : लष्करात असल्याचे सांगून फसवणूक appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लष्करात नोकरीला असल्याचे सांगून खासगी व्यक्तीला मिलेट्रीच्या परिसरात येण्यास मज्जाव असल्याचे सांगत 1 लाख 23 हजारांच्या फर्निचरचा अपहार केल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ चव्हाण (रा. आयप्पा वळ, घोरपडी गाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मकरंद कलिंदर पवार (46, रा. गुरुकृपा बंगलो, …

The post Pune Crime news : लष्करात असल्याचे सांगून फसवणूक appeared first on पुढारी.

Go to Source