व्वा ! हजार रुपयांत टॅब्लेट बनणार लॅपटॉप; आयएमडीच्या शास्त्रज्ञांना डिझाईनचे पेटंट

पुणे : केवळ एक हजार रुपयांत तुमच्या जवळ असलेल्या टॅब्लेटचे रूपांतर लॅपटॉपमध्ये होऊ शकते. अशा प्रकारचे नवे डिझाईन पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. शिरीष खेडीकर यांनी केले आहेे. त्यांना तब्बल सात वर्षे पाठपुरावा केल्यानंतरच याचे पेटंट जाहीर झाले आहे. डॉ. खेडगीकर यांनी 7 ऑगस्ट 2016 रोजी हे संशोधन केले. त्याला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने … The post व्वा ! हजार रुपयांत टॅब्लेट बनणार लॅपटॉप; आयएमडीच्या शास्त्रज्ञांना डिझाईनचे पेटंट appeared first on पुढारी.

व्वा ! हजार रुपयांत टॅब्लेट बनणार लॅपटॉप; आयएमडीच्या शास्त्रज्ञांना डिझाईनचे पेटंट

आशिष देशमुख

पुणे : केवळ एक हजार रुपयांत तुमच्या जवळ असलेल्या टॅब्लेटचे रूपांतर लॅपटॉपमध्ये होऊ शकते. अशा प्रकारचे नवे डिझाईन पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. शिरीष खेडीकर यांनी केले आहेे. त्यांना तब्बल सात वर्षे पाठपुरावा केल्यानंतरच याचे पेटंट जाहीर झाले आहे. डॉ. खेडगीकर यांनी 7 ऑगस्ट 2016 रोजी हे संशोधन केले. त्याला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने नुकतेच 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी (पेटंट क्र.507054) दिली आहे. हे उपकरण पातळ आणि वजनाने हलके आहे. तसेच बहुउद्देशीय स्लाइड-सक्षम बेस संरक्षणात्मक कव्हर म्हणून कार्य करते. स्टँड, कीबोर्ड आणि ट्रॅकपॅड हे एकत्रीत केवळ एक हजार रुपयांच्या खर्चात टॅब्लेटला जोडता येते. हेच डॉ. खेडीकर यांनी दाखवून दिले. स्क्रीन, कीबोर्ड आणि कोपर्‍यांना भौतिक नुकसानापासून मजबूत संरक्षण देते. यात अष्टपैलू मोड असून टॅबलेट मोड, लॅपटॉप मोड, वाचन मोड आणि स्क्रोलिंग मोड आहे. वापरकर्त्याच्या विविध गरजा पूर्ण होतात, असा दावा संशोधकाने केला आहे.
डॉ. खेडीकर यांच्या नावावर पेटंटचे विक्रम
डॉ. खेडीकर यांनी या उपकरणात स्टेनलेस स्टील वापरले आहे. त्यामुळे त्याला एक चांगली मजबुती आली आहे. या पेटंट व्यतिरिक्त डॉ. शिरीष खेडीकर यांनी 30 मार्च 2023 रोजी एकाच दिवसात दहा पेटंट दाखल करून एक विक्रम प्रस्थापित केला होता. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने त्याची नोंद घेतली आहे.
सात वर्षांनंतर मिळाले पेटंट
बाजारात टॅब्लेट अन् लॅपटॉप असे टु इन वन उपकरण उपलब्ध आहे. मात्र, ते सुमारे 10 ते 35 हजार रुपयांच्या किमतीत आहेत. त्यामुळे डॉ. खेडीकर यांच्या या संशोधनाला पेटंट लवकर मिळाले नाही. त्यांनी केवळ 1 हजार रुपयांत ही जादू करून दाखवली. त्यासाठी त्यांनी आपले संशोधन पेटंट कार्यालयाला पटवून दिले. सात वर्षांनंतर त्यांना अखेर हे पेटंट मिळाले.
मी हवामान शास्त्रज्ञ आहे. संगणकशास्त्राशी फारसा संबंध नसतानाही हा प्रयत्न केला. बाजारात टॅब्लेटला लॅपटॉपचे स्वरुप देण्यासाठी 10 ते 35 हजार खर्च आहे. मी ते केवळ एक हजार रुपयांत केले. ते सहज शक्य आहे. हे माझे संशोधन आहे. त्याला मी पेटंट केले. त्यासाठी सात वर्षे मला लढा द्यावा लागला.
-डॉ. शिरीष खेडीकर, शास्त्रज्ञ आयएमडी, पाषाण

हेही वाचा

अशोक चव्हाण यांच्यासोबत कोण? विदर्भात काहींचे वेट अँड वॉच, काही पक्षासोबत ठाम
शिक्षक भरती प्रक्रियेतून कला शिक्षकांना वगळले!
अमरावतीतील काँग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात : आमदार रवी राणा

Latest Marathi News व्वा ! हजार रुपयांत टॅब्लेट बनणार लॅपटॉप; आयएमडीच्या शास्त्रज्ञांना डिझाईनचे पेटंट Brought to You By : Bharat Live News Media.