Weather Update : तापमानात घट; विदर्भात तीन दिवस पावसाचा अंदाज

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : गेल्या चोवीस तासांत मराठवाडा व विदर्भातील तुरळक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र कोकण व मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे आहे. राज्यातील पाऊस आणि उत्तर भारताकडून येणार्या गार वार्याच्या प्रभावामुळे किमान तापमानात घट सुरू झाली आहे. सोमवारी अहमदनगरचे तापमान 12.3 अंशांखाली गेले होते. उत्तर भारतात किमान तापमानाचा पारा 6 ते 12 अंशांवर आहे. त्यामुळे त्या भागातून शीतलहरी राज्यात येत आहेत. शिवाय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यातील काही भागातही पाऊस झाला आहे. या वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, नगर, जळगाव, नाशिकचा पारा 12 ते 13 अंशांवर आला होता.
सोमवारचे किमान तापमान
अहमदनगर 12.3, जळगाव 13.2, कोल्हापूर 18.6, नाशिक 12.7, सांगली 18.2, सातारा 15, सोलापूर 22.4, धाराशिव 21, छत्रपती संभाजीनगर 15.9, परभणी 18.3, नागपूर 19.4, चंद्रपूर 18.6.
हेही वाचा
शिक्षक भरती प्रक्रियेतून कला शिक्षकांना वगळले!
सोलापूर : ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरती रखडली
कोल्हापूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र पुनर्विकासाला गती देणार
Latest Marathi News Weather Update : तापमानात घट; विदर्भात तीन दिवस पावसाचा अंदाज Brought to You By : Bharat Live News Media.
