सरन्यायाधीश 40 वर्षांनी भेटले वर्गमैत्रिणीला; तेही न्यायालयात
नवी दिल्ली : वर्गमित्र 40 वर्षांनी भेटल्याचा आनंद औरच असतो. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी हा आनंद अनुभवला. 1983 च्या हार्वर्ड लॉ स्कूलमधील त्यांच्या वर्गमैत्रिणीने आज सर्वोच्च न्यायालयाला भेट दिली.
आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्या. हिलरी चार्ल्सवर्थ यांना आज सर्वोच्च न्यायालयात निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी एक सुनावणीही सर्वोच्च न्यायालयाच्या पीठावरून ऐकली. या सुनावणीदरम्यानच ज्येष्ठ वकील पराग त्रिपाठीही न्यायालयात आले. तेही न्या. चंद्रचूड व न्या. चार्ल्सवर्थ यांचे हार्वर्डचेच वर्गमित्र आहेत. त्यांना अचानक बघून न्या. चार्ल्सवर्थही चकित झाल्या. काही काळ सुनावणी ऐकल्यानंतर सरन्यायाधीशांनी न्या. चार्ल्सवर्थ यांना सर्वोच्च न्यायालयाचा परिसर दाखवला. यावेळी तिघा वर्गमित्रांचे हास्यविनोदही पाहायला मिळाले.
The post सरन्यायाधीश 40 वर्षांनी भेटले वर्गमैत्रिणीला; तेही न्यायालयात appeared first on Bharat Live News Media.
Home महत्वाची बातमी सरन्यायाधीश 40 वर्षांनी भेटले वर्गमैत्रिणीला; तेही न्यायालयात
सरन्यायाधीश 40 वर्षांनी भेटले वर्गमैत्रिणीला; तेही न्यायालयात
नवी दिल्ली : वर्गमित्र 40 वर्षांनी भेटल्याचा आनंद औरच असतो. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी हा आनंद अनुभवला. 1983 च्या हार्वर्ड लॉ स्कूलमधील त्यांच्या वर्गमैत्रिणीने आज सर्वोच्च न्यायालयाला भेट दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्या. हिलरी चार्ल्सवर्थ यांना आज सर्वोच्च न्यायालयात निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी एक सुनावणीही सर्वोच्च न्यायालयाच्या पीठावरून ऐकली. या सुनावणीदरम्यानच ज्येष्ठ वकील पराग …
The post सरन्यायाधीश 40 वर्षांनी भेटले वर्गमैत्रिणीला; तेही न्यायालयात appeared first on पुढारी.