परळी वैजनाथ : पवनराजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्या मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल!

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी जीवन संपवल्याची घटना दि.६ रोजी उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. तसेच या आत्महत्येबाबत अनेक तर्क वितर्क व चर्चांना उधाण आले होते. सहा दिवसांनंतर सोमवारी (दि.१२) रात्री ९.४५ वा. अखेर प्रल्हाद सावंत मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. … The post परळी वैजनाथ : पवनराजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्या मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल! appeared first on पुढारी.

परळी वैजनाथ : पवनराजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्या मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल!

परळी वैजनाथ; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी जीवन संपवल्याची घटना दि.६ रोजी उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. तसेच या आत्महत्येबाबत अनेक तर्क वितर्क व चर्चांना उधाण आले होते. सहा दिवसांनंतर सोमवारी (दि.१२) रात्री ९.४५ वा. अखेर प्रल्हाद सावंत मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सहापानी चिठ्ठीत जीवन संपवल्याची कारणं सापडली आहेत. यातून मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे दिसून येत आहे.यावरुन व मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद रंगनाथ सांवत यांनी दि. ०६ रोजी प्रेम पन्ना आपार्मेटमध्ये जीवन संपवल्याने पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चौकशी दरम्यान मयताचे खिशात सहापानी चिठ्ठी मिळून आली होती.यामध्ये आत्महत्येच्या कारणांचा उलगडा झाला असुन मयतास आरोपी प्रल्हाद काळे, बँकेचे सचिव गोविंद भरबडे, सचिन भरबडे व सोनपेठ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी मानसिक त्रास देवुन सोनपेठ बँकेकडून आलेली रक्कम 48 लाख रुपये परत करण्यास सांगुन संगणमत करुन मानसिक त्रास व धमक्या दिल्या. त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळुन मयत जीवन संपवण्यास प्रवृत्त झाला. याप्रकरणात मयत प्रल्हाद सावंत यांच्या पत्नीने फिर्याद दिली. यावरुन आरोपींनी मयतास मानसिक त्रास व धमक्या देवून जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. स्टे. परळी शहर येथे आरोपीविरुद्ध गुरनं. 20/2024 कलम 306,506,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनी ससाणे हे करत आहेत.
Latest Marathi News परळी वैजनाथ : पवनराजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्या मृत्युप्रकरणी अखेर गुन्हा दाखल! Brought to You By : Bharat Live News Media.