रत्नागिरी बस स्टँडवर चोरी करणाऱ्या महिलेला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी बस स्टँडवर चोरी करणाऱ्या महिलेला आज (दि. 12) स्थानिक गुन्हे शाखेने आज अटक केली. गेल्या आठवड्यात रत्नागिरी बसस्टॅन्ड येथे एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून महिलेच्या पर्समधील दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती. अनघा अनंत जोशी (63, मुळ रा. ए/351 बसेरा, शिवाजीनगर, रत्नागिरी सध्या रा. जंगली महाराज … The post रत्नागिरी बस स्टँडवर चोरी करणाऱ्या महिलेला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई appeared first on पुढारी.

रत्नागिरी बस स्टँडवर चोरी करणाऱ्या महिलेला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : रत्नागिरी बस स्टँडवर चोरी करणाऱ्या महिलेला आज (दि. 12) स्थानिक गुन्हे शाखेने आज अटक केली. गेल्या आठवड्यात रत्नागिरी बसस्टॅन्ड येथे एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून महिलेच्या पर्समधील दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती.
अनघा अनंत जोशी (63, मुळ रा. ए/351 बसेरा, शिवाजीनगर, रत्नागिरी सध्या रा. जंगली महाराज रोड, शिवाजीनगर पुणे) असे पकडण्यात आलेल्या सराईत महिला गुन्हेगाराचे नाव आहे. ही रेकॉर्डवरील सराईत महिला आरोपी असून तिच्यावर रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, पनवेल या जिल्हयामध्ये एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. 5 फेब्रुवारी रोजी एसटीस्टँड येथे एसटीमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्स मधील सोन्याची 7 ग्रॅम वजनाची बांगडी, रेडमी कंपनीचा मोबाईल आणि रोख 24 हजार 350 रुपये असा एकूण 48 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी पिडीत महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, जनार्दन परबकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन या पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुचना दिल्या.
या पथकाकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरु असताना नमुद गुन्हा हा रेकॉर्डवरील महीला आरोपी अनघा जोशी हीने केलेला असल्याची गोपनीय माहीती मिळाली. त्याआधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्य पथकाने महीला आरोपीला शनिवार 10 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले.तिच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेला एकूण 45, हजाार 350 रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तिचेकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेकडून तपास सुरु आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे,पोलिस हेड काँस्टेबल विजय आंबेकर,महिला पोलीस हेड काँस्टेबल वैष्णवी यादव, पोलीस काँस्टेबल अतुल कांबळे अंमलदार यांनी केलेली आहे.
Latest Marathi News रत्नागिरी बस स्टँडवर चोरी करणाऱ्या महिलेला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.