पुणे : किकवी येथे पाण्याची टाकी फुटून तीन वर्षांची चिमुकली ठार; मुलगी गंभीर जखमी

नसरापूर :पुढारी वृत्तसेवा : वीटभट्टीच्या कामगारासाठी बांधलेली पाण्याची टाकी फुटल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर १३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. जखमी मुलीला जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात केले आहे. आज (दि.१२) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना किकवी (ता. भोर) येथे घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विद्या पांगू जाधव … The post पुणे : किकवी येथे पाण्याची टाकी फुटून तीन वर्षांची चिमुकली ठार; मुलगी गंभीर जखमी appeared first on पुढारी.

पुणे : किकवी येथे पाण्याची टाकी फुटून तीन वर्षांची चिमुकली ठार; मुलगी गंभीर जखमी

नसरापूर :Bharat Live News Media वृत्तसेवा : वीटभट्टीच्या कामगारासाठी बांधलेली पाण्याची टाकी फुटल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर १३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. जखमी मुलीला जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात केले आहे. आज (दि.१२) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना किकवी (ता. भोर) येथे घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
विद्या पांगू जाधव (वय ३) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर लक्ष्मी गोविंद वाघमारे (वय १३, दोघेही सध्या रा. किकवी, मूळ रा. कैलवल, ता. माणगाव, जि. रायगड) अशी जखमी मुलीचे नाव आहे. Pune News
याबाबत अधिक माहिती अशी की, किकवी (ता. भोर) येथील गणेश भिलारे यांच्या शेतातील वीटभट्टीवर कामगारांसाठी आठ बाय सहा फुटाची पाण्याची टाकी एका महिन्यापूर्वी बांधली आहे. याठिकाणी काम करणारे कामगार नेहमीप्रमाणे पाण्याची टाकीमध्ये पाणी भरत होते. त्याचवेळी टाकी फुटून ही दुर्घटना घडली. Pune News
यावेळी खेळणारी तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर १३ वर्षीय मुलगी गंभीररित्या जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
हेही वाचा 

Nashik | पुणे, नागपुरात गुंडांची परेड; नाशिकमध्ये कधी?
पुणेकरांचा असाही फंडा; सिग्नलची पूजा करून केला वाहतूक कोंडीचा निषेध
पुणे पोलिस भाजपचे कार्यकर्ते : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा आरोप

Latest Marathi News पुणे : किकवी येथे पाण्याची टाकी फुटून तीन वर्षांची चिमुकली ठार; मुलगी गंभीर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.