कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी कुणाल पाटील 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली. नागपूर येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकित आ.पाटील यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. खान्देशातून धुळे तालुक्याचे आ.कुणाल पाटील यांना चेअरमनपदाचा मान मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आ.पाटील यांच्या … The post कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी कुणाल पाटील  appeared first on पुढारी.

कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी कुणाल पाटील 

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली. नागपूर येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकित आ.पाटील यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. खान्देशातून धुळे तालुक्याचे आ.कुणाल पाटील यांना चेअरमनपदाचा मान मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आ.पाटील यांच्या निवडीबद्दल धुळे शहरातील कार्यालयात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद साजरा केला.
महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांची जिव्हाळ्याची असलेली संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ नागपूरकडे पाहिजे जाते. सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कापूस उत्पादक पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर पणन महासंघाच्या नागपूर येथील कार्यालयात चेअरमन आणि व्हा.चेअरमनपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमनपदासाठी आ.कुणाल पाटील यांचे नाव सर्वानुमते घोषीत करण्यात आले. त्यामुळे आ.पाटील यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली. तर व्हा.चेअरमन म्हणून खामगाव येथील प्रसन्नजीत पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक अधिकारी शिंगतकर, नवनिर्वाचित संचालक सुरेश देशमुख, संजय खाडे, प्रफ्फुल मानकर, अनंत देशमुख, शिरीष धोत्रे, धृपतराव सावळे, संजय पवार, पंडीतराव चोखटे, अ‍ॅड.विष्णूपंत सोळंके, राजेंद्र केशवे, शिवाजीराव दसपुते, सुरेश चिंचोळकर, राजकिशोर मोदी, उषाताई शिंदे, सुनिता अळसपुरे हे उपस्थित होते. आ. कुणाल पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. दरम्यान आ.कुणाल पाटील यांच्यासोबत धुळे येथील माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाणे हे उपस्थित होते.
धुळ्यात आनंदोत्सव
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या रुपाने खान्देशातून पहिल्यांदाच निवड झाल्याने जिल्हयातील आ.पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी धुळे येथील कार्यालयात फटाके फोडून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, उपसभापती योगेश पाटील, विशेष कार्यअधिकारी प्रकाश पाटील, एन.डी.पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, खरेदी विक्रीचे व्हा.चेअरमन दिनकर पाटील, भिमसिंग राजपूत, दत्तू पाटील, संदिप पाटील, कृष्णा पाटील, विजय पाटील, संतोष राजपूत, नंदू धनगर, प्रकाश गुजर, ऋषीकेश ठाकरे, सुरेश भिल आदी उपस्थित होते.
हेही वाचा :

Dhule News : सामोडे’तील 29 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ
Ashok Chavan Resign : हिंगोलीत काँग्रेसला पडणार खिंडार?; अशोक चव्हाण समर्थकांच्या भूमिकेकडे नजरा
काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Latest Marathi News कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी कुणाल पाटील  Brought to You By : Bharat Live News Media.