अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक: विजय वडेट्टीवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा आमच्यासाठी धक्कादायक आहे. मात्र, त्यांनी अचानक का निर्णय घेतला माहित नाही. अलीकडे त्यांची माझ्याशी चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. आपण कुठेही जात नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मी २००७ … The post अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक: विजय वडेट्टीवार appeared first on पुढारी.

अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक: विजय वडेट्टीवार

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा आमच्यासाठी धक्कादायक आहे. मात्र, त्यांनी अचानक का निर्णय घेतला माहित नाही. अलीकडे त्यांची माझ्याशी चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. आपण कुठेही जात नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मी २००७ पासून त्यांच्या बरोबर काम केले आहे. मंत्रिमंडळात दोनदा होतो. अतिशय सौहार्दपूर्ण संबंध असल्यानेच कदाचित चर्चा होत आहे. ते गेले म्हणून विजय वडेट्टीवार पण जातील, पण त्यात तथ्य नाही, मी मतदारसंघात फिरत आहे, असेही  वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मात्र, ज्या पद्धतीने पक्ष भाजप फोडत आहेत, मतदार राजा या फुटीला वैतागला आहे. मतदार नक्कीच आगामी निवडणुकीत धडा शिकवतील, असेही ते म्हणाले. चव्हाण कसल्यातरी चौकशीच्या चिंतेत असल्याची माहिती मिळाल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा 

अशोक चव्हाणांचा निर्णय दुर्देवी, आणखी काही आमदार काँग्रेस सोडणार, ही अफवा’ – पृथ्वीराज चव्हाण
Manoj Jarange Patil …तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही : मनोज जरांगे-पाटील
‘या विश्वासघातकांना  समजत नाही …’ : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्‍यावर जयराम रमेश भडकले

Latest Marathi News अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक: विजय वडेट्टीवार Brought to You By : Bharat Live News Media.