कोल्हापूर : १३ व्या शतकातील हळे कन्नड शिलालेखावर प्रकाशझोत

कोल्हापूर; सागर यादव : 13 व्या शतकातील हळे कन्नड (जुनी कन्नड) भाषा लिपीतील शिलालेखाचे वाचन करून महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहितीवर प्रकाशझोत टाकला आहे. दिगंबर जैन बोर्डिंग परिसरात ठेवण्यात आलेल्या जैन तीर्थंकराच्या मूर्तीवर हा शिलालेख संशोधकांना आढळून आला आहे. कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंग येथील बागेच्या आवारात काही प्राचीन भग्नावशेष व जैन तीर्थंकरांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी … The post कोल्हापूर : १३ व्या शतकातील हळे कन्नड शिलालेखावर प्रकाशझोत appeared first on पुढारी.

कोल्हापूर : १३ व्या शतकातील हळे कन्नड शिलालेखावर प्रकाशझोत

कोल्हापूर; सागर यादव : 13 व्या शतकातील हळे कन्नड (जुनी कन्नड) भाषा लिपीतील शिलालेखाचे वाचन करून महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहितीवर प्रकाशझोत टाकला आहे. दिगंबर जैन बोर्डिंग परिसरात ठेवण्यात आलेल्या जैन तीर्थंकराच्या मूर्तीवर हा शिलालेख संशोधकांना आढळून आला आहे.
कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंग येथील बागेच्या आवारात काही प्राचीन भग्नावशेष व जैन तीर्थंकरांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी एका मूर्तीच्या आसनावर (पीठिका) हा कोरीव लेख आहे. पीठिकेच्या दर्शनी भागावर दोन व खाली एक असा एकूण तीन ओळींचा हा लेख आहे. ही मूर्ती ‘आदिनाथ चौवीसी’ या प्रकारातील असून पीठिकेवर आसनस्थ आदिनाथ, प्रभावळीवर 21 तीर्थंकर, आदिनाथांच्या डाव्या व उजव्या बाजूस अनुक्रमे पार्श्वनाथ व सुपार्श्वनाथ असे एकूण 24 तीर्थंकर, तसेच यक्ष व यक्षिणी कोरण्यात आल्या आहेत. इतिहासाचे विद्यार्थी चैतन्य अष्टेकर यांना हा शिलालेख आढळून आला. यानंतर त्यांनी याचे ठसे शिलालेख तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास पडीगर यांना पाठविले. त्यानुसार त्यांनी त्याचे वाचन केले. यासाठी त्यांना अभ्यासक अनिल दुधाणे, सचिन पाटील, विकास नाईक, आशिष कुलकर्णी, संदीप पाटील यांचे सहकार्य मिळाले.
जैन धर्माचे दिगंबर व श्वेतांबर असे दोन प्रमुख पंथ आहेत. यापैकी दिगंबर पंथामध्ये मूळ संघ नामक प्राचीन संप्रदाय आहे. हा संप्रदाय काही शाखांमध्ये अथवा गणांमध्ये विभाजित असून देशीय गण, बालत्कार गण, सूरस्त गण, सेन गण इ. गण यामध्ये येतात. कोल्हापुरात इ.स. 11-12व्या शतकात राज्य करणार्‍या शिलाहार राजवंशाच्या काळात जैन धर्माला महत्त्व प्राप्त झाल्याचे इतिहासातून समजते. शिलाहार राजवंशातील काही राण्या, सामंत, अधिकारी, व्यापारी हे जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. शिवाय उपरोक्त मूळ संघाच्या देशीय गणातील माघनंदी सिद्धान्तदेव नामक आचार्याचा व त्याच्या शिष्यांचा उल्लेख शिलाहारांच्या शिलालेखांत सापडतो. तसेच सूरस्त गणाचा देखील उल्लेख आहे. एकाच संप्रदायातील दोन शाखांचा एकाच लेखात उल्लेख येणे ही विशेष बाब आहे. यामुळेच हा लेख महत्त्वपूर्ण ठरतो.
शिलालेखाचा अर्थ
‘मूळसंघ देशीयगण… मोंटगाळे येथील सूरस्त गणाच्या मुख्य पशुपालकांनी या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली’ असा अर्थ प्रतीत होतो. यातील ‘मोंटगाळे’ या ठिकाणाची ओळख अजून पटलेली नाही. पण हे ठिकाण कोल्हापूर शहरानजीकच असावे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
The post कोल्हापूर : १३ व्या शतकातील हळे कन्नड शिलालेखावर प्रकाशझोत appeared first on पुढारी.

कोल्हापूर; सागर यादव : 13 व्या शतकातील हळे कन्नड (जुनी कन्नड) भाषा लिपीतील शिलालेखाचे वाचन करून महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहितीवर प्रकाशझोत टाकला आहे. दिगंबर जैन बोर्डिंग परिसरात ठेवण्यात आलेल्या जैन तीर्थंकराच्या मूर्तीवर हा शिलालेख संशोधकांना आढळून आला आहे. कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंग येथील बागेच्या आवारात काही प्राचीन भग्नावशेष व जैन तीर्थंकरांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी …

The post कोल्हापूर : १३ व्या शतकातील हळे कन्नड शिलालेखावर प्रकाशझोत appeared first on पुढारी.

Go to Source