Pune : नितीन आटोळे पुन्हा अजित पवार गटात

शिवनगर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी बारामती तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष नितीन आटोळे (खांडज) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पवार यांच्या गोविंद बागेतील निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांच्या गटात प्रवेश केला होता; मात्र रविवारी (दि. 11) पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत … The post Pune : नितीन आटोळे पुन्हा अजित पवार गटात appeared first on पुढारी.

Pune : नितीन आटोळे पुन्हा अजित पवार गटात

शिवनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी बारामती तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष नितीन आटोळे (खांडज) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पवार यांच्या गोविंद बागेतील निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांच्या गटात प्रवेश केला होता; मात्र रविवारी (दि. 11) पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नितीन आटोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर तालुक्यातील काही ज्येष्ठ नेते मंडळींनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून तालुक्यामध्ये शरद पवार गटाचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न
केला. दरम्यान आटोळे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल तालुक्यामध्ये आता उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
डी. डी. जगताप यांच्या प्रयत्नांना यश!
बारामती तालुक्यातील भिकोबानगर येथील डी. डी. जगताप हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रयत्नामुळे नितीन आटोळे यांची अजित पवार गटामध्ये घरवापसी झाल्याचे बोलले जात आहे.
Latest Marathi News Pune : नितीन आटोळे पुन्हा अजित पवार गटात Brought to You By : Bharat Live News Media.