’ऑक्सिजन पार्क’मुळे पुण्याच्या वैभवात भर : उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : ‘खडकवासला धरण परिसरातील पडीक जमिनीवर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणार्‍या ऑक्सिजन पार्क नक्षत्र गार्डन प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरासह सिंहगड, खडकवासला परिसराच्या वैभवात भर पडणार आहे,’ असे प्रतिपादन उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. खडकवासला येथे ऑक्सिजन पार्क पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले, त्या … The post ’ऑक्सिजन पार्क’मुळे पुण्याच्या वैभवात भर : उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील appeared first on पुढारी.

’ऑक्सिजन पार्क’मुळे पुण्याच्या वैभवात भर : उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : ‘खडकवासला धरण परिसरातील पडीक जमिनीवर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणार्‍या ऑक्सिजन पार्क नक्षत्र गार्डन प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरासह सिंहगड, खडकवासला परिसराच्या वैभवात भर पडणार आहे,’ असे प्रतिपादन उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. खडकवासला येथे ऑक्सिजन पार्क पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, ’आमदार भीमराव तापकीर यांच्या दूरदृष्टीमुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. त्यांनी सर्वाधिक निधी खडकवासला मतदारसंघाच्या विकासासाठी आणून येथील विकासाला नवीन दिशा दिली आहे.’
उत्तमनगरचे माजी सरपंच सुभाष नाणेकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या आयुष्यमान भारत व शासकीय योजनांचे कार्डचे वाटप पाटील व तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. पीएमआरडीएचे संचालक रमेश कोंडे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, हरिदास चरवड, राजश्री नवले, राणी भोसले, अल्पना वरपे, वृषाली चौधरी, सचिन मोरे, गणेश वरपे, अरुण दांगट, सचिन पायगुडे, नवनाथ तागुंदे, दत्तात्रय कोल्हे, राधेश्याम शर्मा, रश्मी घुले, मनीषा मोरे, उमेश सरपाटील, अभिजित धावडे, निखिल धावडे, रूपेश घुले पाटील, बाप्पूसाहेब पोकळे, हेमंत दांगट, सचिन दांगट, गंगाधर भडावळे, सारंग नवले, मारुती किंद्रे, अनिल मते, किशोर
पोकळे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्‍हाडे आदी उपस्थित होते.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या ओसाड जागेवर नवीन विकसित पर्यटन होणार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना रोजगार, व्यवसायाची संधी मिळणार आहे.
                                                             – भीमराव तापकीर, आमदार
Latest Marathi News ’ऑक्सिजन पार्क’मुळे पुण्याच्या वैभवात भर : उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील Brought to You By : Bharat Live News Media.