जंगल सफारीवर प्राणी हल्ला का करत नाहीत?

वॉशिंग्टन : जंगल सफारीचे आकर्षण अनेकांना असते आणि बहुतांशी वेळा अशा जंगल सफारी खुल्या जीपमधूनच असतात. अपवाद वगळता अशा सफारीवर प्राणी हल्ला करत नाहीत, असेच दिसून येते. त्यामुळे साहजिकच, अशा जंगल सफारीवर प्राणी हल्ले का करत नाहीत, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहणार नाही. याचीच काही कारणे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडीओमधून नमूद केली … The post जंगल सफारीवर प्राणी हल्ला का करत नाहीत? appeared first on पुढारी.

जंगल सफारीवर प्राणी हल्ला का करत नाहीत?

वॉशिंग्टन : जंगल सफारीचे आकर्षण अनेकांना असते आणि बहुतांशी वेळा अशा जंगल सफारी खुल्या जीपमधूनच असतात. अपवाद वगळता अशा सफारीवर प्राणी हल्ला करत नाहीत, असेच दिसून येते. त्यामुळे साहजिकच, अशा जंगल सफारीवर प्राणी हल्ले का करत नाहीत, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहणार नाही. याचीच काही कारणे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडीओमधून नमूद केली गेली आहेत.
या व्हिडीओत असे नमूद आहे की, पर्यटकांना जंगल परिसरातून जात असताना परिसराची 360 अंश कोनातून द़ृश्य पाहता येतील. यामुळे, जंगलातील कोणत्याही कोपर्‍यावरून प्राणी आला तरी तो दिसेल, याची तजवीज होते. आता जंगली प्राणी अशा जीपवर हल्ला का करत नाहीत, याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलात हे असे प्राणी सफारी वाहनाला देखील मोठी वस्तू किंवा मोठा प्राणी समजतात. सफारीचे वाहनही मोठे असते. त्यामुळे सिंह, चित्त्यासारखे प्राणी त्यावर आपली शक्ती खर्च करणे पसंत करत नाहीत. त्यामुळे सफारी वाहनात बसलेले असताना जवळ सिंह आला आणि तो आक्रमक झाला तरी घाबरून जाऊ नये, अशा मार्गदर्शकांच्या सूचना असतात. बहुतेक प्राण्यांना घाबरलेल्या आणि पळून जाणार्‍या प्राण्यांची शिकार करायला आवडते. त्यामुळे शांत राहिल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असेही सांगितले जाते.
आणखी एक कारण म्हणजे जंगलातील बहुतेक प्राण्यांना सफारी वाहनाची सवय झाली आहे. जेव्हा जेव्हा एखादे राष्ट्रीय उद्यान तयार केले जाते, तेव्हा प्राण्यांची वागणूक जाणून घेण्यासाठी अधिकारी त्यांच्या जवळ सफारी वाहने चालवतात. प्राणी काही दिवस आक्रमक असतात; पण नंतर त्यांना कळते की, हे लोक आपल्या कुटुंबाचा एक भाग आहेत. ते जंगल सफारी वाहन आणि त्यात बसलेले लोक यांना धोका म्हणून पाहत नाहीत. पण, असे असले तरी पर्यटकांनीही बर्‍याच बाबतीत दक्षता घेणे आवश्यक असते. जीपबाहेर हात बाहेर न काढणे, प्राण्यांच्या दिशेने हातवारे न करणे, याचाही यात समावेश आहे.
Latest Marathi News जंगल सफारीवर प्राणी हल्ला का करत नाहीत? Brought to You By : Bharat Live News Media.