जरांगेंचं दिवसभर उपोषण अन् रात्री हरिनामाचा गजर

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : “सदैव जे असती हरिनामात दंग, असावेत ते सदा आरोग्य संपन्न”!  या उक्तीचा प्रत्यय शनिवारी (दि.११) मनोज जरांगे-पाटील यांना पाहून आला. चार दिवसांचा सलग राज्यभर दौरा केला. त्यानंतर तिसऱ्यांदा सुरू झालेल्या आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी दिवसभर उपोषण केलं. व त्यानंतर रात्री तब्बल दोन तास किर्तनकारांसोबत उभे राहून टाळ हाती घेत जरांगेंनी कीर्तनात … The post जरांगेंचं दिवसभर उपोषण अन् रात्री हरिनामाचा गजर appeared first on पुढारी.

जरांगेंचं दिवसभर उपोषण अन् रात्री हरिनामाचा गजर

वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : “सदैव जे असती हरिनामात दंग, असावेत ते सदा आरोग्य संपन्न”!  या उक्तीचा प्रत्यय शनिवारी (दि.११) मनोज जरांगे-पाटील यांना पाहून आला. चार दिवसांचा सलग राज्यभर दौरा केला. त्यानंतर तिसऱ्यांदा सुरू झालेल्या आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी दिवसभर उपोषण केलं. व त्यानंतर रात्री तब्बल दोन तास किर्तनकारांसोबत उभे राहून टाळ हाती घेत जरांगेंनी कीर्तनात सहभाग घेतला.
मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी कीर्तनात थेट सहभाग घेतल्याने मराठा आंदोलनकर्त्यांसह किर्तनकारांचा उत्साह वाढला. टाळ्यांच्या कडकडाटात मराठा आंदोलकांनी यावेळी कीर्तनसेवेला दाद दिली. अखंड हरिनामाच्या गजरात जरांगे- पाटील यांची शनिवारी किर्तनसेवा पहायला मिळाली.
 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे- पाटील यांनी तिसऱ्यांदा अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. आज (दि.११) त्यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि.१०) रात्री आमरण उपोषणाच्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या किर्तन सोहळ्यात हभप बबन महाराज मंजरीकर यांचे हरि कीर्तन सेवा झाली. यामध्ये खुद्द जरांगे पाटील यांनी किर्तनकारांसोबत बाजूला उभे राहून दोन तास कीर्तनात सहभाग घेत घेतला. टाळ हाती घेऊन मुखी हरिनामाचा गजर करत उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांचा उत्साह त्यांनी वाढवला.
हेही वाचा :

Pm Modi in MP : काँग्रेसकडे दोनच शक्ती फूट आणि लूट : PM मोदींची घणाघाती टीका
वयाच काय घेवून बसलाय, फक्‍त जिगर पाहिजे…वय वर्ष १०७, दोन सुर्वणपदकांवर मोहोर!
ईव्हीएम चोरी प्रकरण : दोन सदस्यीय चौकशी समितीची घटनास्थळास भेट

Latest Marathi News जरांगेंचं दिवसभर उपोषण अन् रात्री हरिनामाचा गजर Brought to You By : Bharat Live News Media.