संतापजनक… अंगणवाडीत नोकरीच्या आमिषाने सुमारे २० महिलांवर सामूहिक बलात्कार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजस्थानमध्ये एक संतापजनक आणि घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुमारे २० महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाली जिल्ह्यातील एका पीडितेने तक्रार दिली आहे.राजस्थानमधील सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष महेंद्र मेवाडा आणि माजी नगरपरिषदेचे आयुक्त महेंद्र चौधरी यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण, पीडित महिलांना पैशासाठी केले ब्लॅकमेल
पीडित महिला अन्य महिलांसोबत अंगणवाडीत काम करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सिरोहीला गेली होती. त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आला. मात्र अन्नातून गुंगीचे औषध देण्यात आले. बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आले. आरोपींनी लैंगिक अत्याचाराचे मोबाईल फोनमध्ये चित्रीकरणही केले. यानंतर हे फुटेज सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणीही केली.
पीडित महिलेने प्रथम पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेली. मात्र तिची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. काही दिवसांनी तिला आपल्या प्रमाणे आणखी १९ महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती मिळाली. सर्व महिलांनी न्यायालयात धाव घेतली. राजस्थान उच्च न्यायालयाने आता आठ महिलांच्या याचिकेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
तपास अधिकारी काय म्हणाले?
या प्रकरणाचा तपास करत असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक पारस चौधरी यांनी सांगितले की, “काही काळापूर्वी या महिलांनी सिरोही महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र चौकशीत ही तक्रार खोटी असल्याचे समोर आले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने ८ महिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसारयाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.”
हेही वाचा :
Pakistan Election 2024: इम्रान खान समर्थक रस्त्यावर, निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप
मुंबई हायकोर्ट स्वीय सहायक पदाचा पेपर सोशल मीडियावर फुटला; ॲडमिनविरूद्ध गुन्हा
The post संतापजनक… अंगणवाडीत नोकरीच्या आमिषाने सुमारे २० महिलांवर सामूहिक बलात्कार appeared first on Bharat Live News Media.
