अकोला प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई होणार : देवेंद्र फडणवीस
नागपूर, पुढारी वृत्तसेवा: अकोला येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. भंडारा येथून शासन आपल्या दारी अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सहभागी झाल्यानंतर नागपुरात ते बोलत होते.
खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत केलेल्या ट्विटबाबत छेडले असता फडणवीस म्हणाले की, राऊत यांची मानसिकता यावरून दिसून येत आहे. बावनकुळे आपल्या संपूर्ण परिवारासोबत तिथे गेले आहेत.
ज्या हॉटेललात ते थांबले आहेत, तिथे रेस्टॉरंटच्या बाजूला केसिनो आहे. मात्र, राऊत यांनी अर्धा फोटो ट्विट केला आहे. पूर्ण फोटो ट्विट केला असता तर बावनकुळे यांची पत्नी, मुलगी, नातू सर्व त्या फोटोत दिसले असते. मुळात ही विकृत मानसिकता थांबली पाहिजे, यावर देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला.
हेही वाचा
नागपूर : राजू ढेंगरे हत्येप्रकरणी दोघा नोकरांना मध्यप्रदेशमध्ये अटक
नागपूर : जवान अक्षय भिलकर यांच्यावर रामटेक येथे अंत्यसंस्कार
नागपूर: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ४ मुलांसह ११ जण जखमी
The post अकोला प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई होणार : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.
नागपूर, पुढारी वृत्तसेवा: अकोला येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. भंडारा येथून शासन आपल्या दारी अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सहभागी झाल्यानंतर नागपुरात ते बोलत होते. खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत केलेल्या …
The post अकोला प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई होणार : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.