सांगली: विटा येथे स्टेशनरी दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग

विटा : पुढारी वृत्तसेवा : विट्यात एका स्टेशनरी दुकानाच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत तब्बल १४ लाखांचे साहित्य भस्मसात झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना आज (दि.१०)  सकाळी साडेसहाच्या पूर्वी घडली. याबाबत संबंधित दुकानाचे मालक समकित सुनिल शहा यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे. Sangli News याबाबत मिळालेली माहिती अशी की, विट्यातील गाव भागात … The post सांगली: विटा येथे स्टेशनरी दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग appeared first on पुढारी.

सांगली: विटा येथे स्टेशनरी दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग

विटा : Bharat Live News Media वृत्तसेवा : विट्यात एका स्टेशनरी दुकानाच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत तब्बल १४ लाखांचे साहित्य भस्मसात झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना आज (दि.१०)  सकाळी साडेसहाच्या पूर्वी घडली. याबाबत संबंधित दुकानाचे मालक समकित सुनिल शहा यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे. Sangli News
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विट्यातील गाव भागात जुन्या दगडी पाण्याच्या टाकीशेजारी समकीत शहा यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. या दुकानातील वह्या, पुस्तके, कंपास, कागद, पेन, फाइल्स वगैरे शालेय साहित्याचे गोडाऊन जवळच असलेल्या बाबर गल्लीकडे जाणाऱ्या एका तीनमजली इमारतीच्या तळघरात आहे. आज पहाटे साडेसहाच्या दरम्यान शटर बंद अवस्थेत असलेल्या या गोडाऊनमधून धूर येत असल्याचे काही स्थानिक लोकांनी पाहिले. त्यावेळी या गोडाऊनच्या मोठ्या शटर च्या बाजूला बऱ्याच दिवसांपासूनचा पडलेला कचरा पेटल्याचे आणि त्यामुळे आत जाणाऱ्या लाईटच्या वायर लाही आग लागल्याचे दिसले. त्यावेळी हा धूर या जळलेल्या कचऱ्याचा असावा, असे समजून लोकांनी त्याकडे प्रारंभी दुर्लक्ष केले.
मात्र,  ७० ते ८० फूट लांबीच्या गोडाऊनच्या दुसऱ्या बाजूच्या शटरच्या छोट्या दरवाजातूनही धूर येत असल्याचे पाहून तेथील रहिवाशांनी विटा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगून वीज पुरवठा बंद करण्याची विनंती केली. तसेच पालिकेच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण केले. तोपर्यंत सकाळचे आठ वाजून गेले होते. तसेच स्थानिक माजी नगरसेवक अविनाश चोथे, प्रसाद लीपारे, राजाभाऊ तोड कर आदींना याबाबत माहिती दिली. ते घटनास्थळी आले. मात्र, दोन्ही बाजूने कुलूप बंद अवस्थेत असलेले शटर आणि आतमध्ये मोठ्या प्रमाणात लागलेली आग यामुळे बाहेरून पाणी कितीही मारले तरी आत जात नव्हते.
शेवटी तात्काळ जेसीपी बोलावून एका बाजूचे मोठे शटर तोडले आणि त्यानंतर चार पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने तीन तासांच्या प्रयत्न नंतर आग विझवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत बरेच साहित्य भस्मसात झाले. गेल्या दोन दिवसांपूर्वीच या गोडाऊनमध्ये समकीत शहा यांनी नव्याने साहित्य भरले होते. अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे शहा आणि त्यांचे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर आणि राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी घटनास्थळी भेट देत शहा कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा 

आर्थिक कारणातून सांगलीतील तरूणाचा खून
सांगली : मेव्हण्याकडून तरुणाचा निर्घृण खून
सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदमचा खून

Latest Marathi News सांगली: विटा येथे स्टेशनरी दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग Brought to You By : Bharat Live News Media.