शिर्डीसाठी काँग्रेस आग्रही : आमदार बाळासाहेब थोरात

नगर : पुढारी वृत्तसेवा :  कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतो, त्यावर लोकसभेचे जागावाटप करण्यात येते. आम्हाला विजयाची खात्री असल्याने आम्ही शिर्डीच्या जागेसाठी आग्रही आहोत. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय चर्चेअंती होईल, असे विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत आमदार थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत … The post शिर्डीसाठी काँग्रेस आग्रही : आमदार बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

शिर्डीसाठी काँग्रेस आग्रही : आमदार बाळासाहेब थोरात

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतो, त्यावर लोकसभेचे जागावाटप करण्यात येते. आम्हाला विजयाची खात्री असल्याने आम्ही शिर्डीच्या जागेसाठी आग्रही आहोत. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय चर्चेअंती होईल, असे विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत आमदार थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत विस्तृत भूमिका मांडली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सहभागी झाले असले, तरी त्यांनी मांडलेल्या किमान समान कार्यक्रमावर एकत्र येऊन चर्चा करू आणि मग जनतेला आश्वासित करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे, असे सांगून सरकारवर टीका करताना आमदार थोरात म्हणाले, की कांद्याची निर्यातबंदी केल्याने भाव मिळत नाही. कापूस, सोयाबीनचेही दर पडले आहेत. शेतकर्‍यांसाठी प्रचंड अडचणीचा काळ आहे. टँकरची संख्या वाढत आहे. कायद्याचा धाक राहिला नाही. तीन महत्त्वाकांक्षी लोकांनी एकत्र येऊन सरकार निर्माण केले. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्यासाठी स्पर्धा लागली आहे. त्यांचा मेळ घालण्यातच वेळ जात आहे. राज्यकर्तेच गुन्हेगार होतात, त्यामुळे राज्यात अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक याच्यावर अत्यंत थंड डोक्याने गोळ्या झाडण्यात आल्या. सत्ताधारी भाजपचे आमदार पोलिस ठाण्यात आपल्याच सहकारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांवर गोळ्या झाडतो. त्यामुळे राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. मुख्यमंत्र्यासोबत गुन्हेगारांचे फोटो व्हायरल होतात. राज्यकर्तेच गुन्हेगार होतात, त्यामुळे राज्यात अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी आता जनतेने आवाज उठविणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा आमदार थोरात यांनी व्यक्त केली. स्वायत्त संस्था सत्ताधार्‍यांच्या गुलाम झाल्या आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. चंडीगड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता जनतेला निर्णय घ्यावा लागेल. न्यायालयात निर्णय मिळत नाही आता जनतेच्या न्यायालयात न्याय मिळवू, असेही ते म्हणाले. आमदार लहू कानडे, नूतन जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, किरण काळे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
देवरा, सिद्दिकी म्हणजे काँग्रेस नाही
काँग्रेसला दोन मोठे नेते सोडून गेल्याबाबत विचारले असता थोरात म्हणाले, की झाडाला कायम नवीन पलवी फुटते. देवरा आणि सिद्दिकी म्हणजे काँग्रेस नाही. जनता आमच्याबरोबर आहे. राजकारण हा माणसाच्या मनाचा खेळ आहे. येणार्‍या निवडणुकीत कळेल, जनता कोणाच्या बरोबर आहे ते.
अटलजींनंतर फक्त गडकरी
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपमध्ये स्पष्ट बोलणारा चांगला नेता म्हणजे नितीन गडकरी, असे सांगून थोरात म्हणाले, की पक्षबदलावर गडकरी यांची टिप्पणी चांगली आहे. ते म्हणतात- आम्ही आंदोलने केली, लाठ्याकाठ्या खाल्ल्या; पण पक्ष कधीच सोडला नाही. आता कोणी कुठेही उड्या मारत आहे.
‘ईव्हीएम’बाबत शंका
ईव्हीएमबद्दल विचारले असता आमदार थोरात म्हणाले, चंडीगडच्या महापौर निवडीनंतर मला ‘ईव्हीएम’बद्दलही शंका वाटू लागली आहे. मतमोजणी प्रक्रियेवर कॅमेर्‍याचे लक्ष असतानाही मतपत्रिका बदलल्या जातात, तर मग गोपनीय मतपेटीचे काय होत असेल? त्यामुळे आतापर्यंत नाही, पण आता मनात ‘ईव्हीएम’बद्दल शंका निर्माण झाली आहे.
जातनिहाय जनगणना हवी
आरक्षणाच्या मागणीने राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. सर्व समाजबांधवांना एकत्रच राहायचे आहे; परंतु आज कटुता निर्माण झाल्यासारखे वाटत आहे. आरक्षणाची मागणी जरी अराजकीय असली तरी त्यात राजकारण येते. असे होऊ नये. त्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करा, अशी मागणी केली आहे.
वकील संरक्षण कायदा आवश्यक
राहुरी येथील वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. कुटुंबच संपल्याने वकिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने वकिलांना गुन्हेगारांच्या केस लढवाव्या लागतात. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणे गरजेचे असून, तसा कायदा विधिमंडळात आणणे आवश्यक आहे.
 
 
Latest Marathi News शिर्डीसाठी काँग्रेस आग्रही : आमदार बाळासाहेब थोरात Brought to You By : Bharat Live News Media.