Nagar : अडीच महिन्यांत पाच कोटी खर्ची !

नगर : पुढारी वृत्तसेवा : सरकारने ग्रामविकासासाठी 14 व्या वित्त आयोगातून दिलेल्या निधीपैकी डिसेंबरच्या एका अहवालानुसार ग्रामपंचायतींकडे तब्बल 5 कोटी 57 लाख रुपये अखर्चित दिसत होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तालुका प्रशासनाला सक्त सूचना केल्याने अडीच महिन्यांतच तब्बल पाच कोटींचे नियोजन झाले, तर आजमितीला केवळ 69 लाख रुपये शिल्लक असल्याचे दिसते. येत्या … The post Nagar : अडीच महिन्यांत पाच कोटी खर्ची ! appeared first on पुढारी.

Nagar : अडीच महिन्यांत पाच कोटी खर्ची !

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : सरकारने ग्रामविकासासाठी 14 व्या वित्त आयोगातून दिलेल्या निधीपैकी डिसेंबरच्या एका अहवालानुसार ग्रामपंचायतींकडे तब्बल 5 कोटी 57 लाख रुपये अखर्चित दिसत होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तालुका प्रशासनाला सक्त सूचना केल्याने अडीच महिन्यांतच तब्बल पाच कोटींचे नियोजन झाले, तर आजमितीला केवळ 69 लाख रुपये शिल्लक असल्याचे दिसते. येत्या आठवडाभरात हा निधीही खर्च होणार असल्याचे सांगितले जाते. केंद्र व राज्य शासनाकडून 2015-16 ते 2019-20 या कालावधीत जिल्हा परिषद स्तरावर बंधित आणि अबंधित निधीचे टप्पाटप्प्याने वाटप केले होते.
पाच वर्षात जिल्ह्याला 756 कोटी 33 लाखांचा निधी प्राप्त झाला होता. 2019-20 मध्ये या खर्चाचा कालावधी संपला, त्यानंतर वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. पुढे 2020-21 पासून 15 व्या वित्त आयोगाचा निधी सुरू झाला. तरीही 14 व्या वित्त आयोगाचा निधी अखर्चितच दिसत होता. डिसेंबर 2023 च्या प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे 5 कोटी 57 लाखांचा निधी अखर्चित दिसत होता. हा निधी खर्च करण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात मायक्रो प्लॅनिंग केला. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासमवेत बैठका घेतल्या. त्यामुळे डिसेंबरमध्येच अखर्चितचा आकडा कमी झाला. फेब्रुवारीमध्ये 5.69 कोटींपैकी 5 कोटी खर्च झाले आहेत तर 69 लाख अखर्चित आहेत. शासनाने 28 फेब्रुवारी 2024 ही मुदत वाढवून दिली. त्यामुळे उवर्रीत 69 लाखांचा निधी खर्च करण्यासाठी नियोजन केले आहे.
दरम्यान, गेल्या पाच वर्षांत अखर्चित असणारी 5 कोटींची ही रक्कम प्रशासनाने मोठ्या तत्परतेने अगदी अडीच ते तीन महिन्यांत खर्ची केल्याचे दिसले आहे. या निधीतून गावविकासाला चालना मिळाल्याचे सांगितले जाते.
अखर्चितची आकडेवारी
तालुका दोन महिन्यांपूर्वी सध्यस्थिती
अकोले 1,71,26,890 3,28,999
नगर 1,21,40,887 2,22,677
पारनेर 57,03,851 1,85,724
कर्जत 32,63,469 3,73,047
पाथर्डी 30,08,526 21807
जामखेड 29,96,081 9,60,620
श्रीरामपूर 27,14,688 19,13,897
शेवगाव 25,17,632 4,49,752
संगमनेर 22,19,997 7,98,997
राहुरी 11,34,988 3253
नेवासा 10,54,036 9,44,486
श्रीगोंदा 10,00,320 7,14,716
राहाता 8,78,641 00
कोपरगाव 16,697 22541
Latest Marathi News Nagar : अडीच महिन्यांत पाच कोटी खर्ची ! Brought to You By : Bharat Live News Media.