पणजी होणार भारतातील पहिले एलपीजी मुक्त शहर
प्रभाकर धुरी
पणजी : गोवा हे पहिले रॉकेलमुक्त राज्य म्हणून घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारने 18 ते 24 महिन्यांत पणजीला भारतातील पहिले एलपीजी मुक्त शहर बनवण्याचा आराखडा तयार केला आहे. लवकरच एलपीजी ऐवजी स्वयंपाकघरात पाईपलाईनद्वारा नैसर्गिक गॅस पुरवला जाणार आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी, जीएनएसपीएलला प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी राज्य सरकारच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रॉकेलमुक्त झालेले गोवा हे देशातील पहिले राज्य आहे, अशी घोषणा राज्याचे बजेट मांडताना केली होती. त्यानंतर आता गोव्याची राजधानी असलेल्या पणजीला एलपीजी मुक्त बनवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून येत्या दीड ते दोन वर्षात प्रत्येकाला पाईपलाईनच्या माध्यमातून स्वयंपाक घरात नैसर्गिक गॅस उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा
Miller’s Girl : २१ वर्षांची जेना ओर्टेगा, ५२ वर्षांचा मार्टिन फ्रीमन यांच्यातील इंटिमेट सीन व्हायरल, संतापलेल्या नेटकऱ्यांनी …
Shaktipeeth Highway : कोल्हापूरसह तुळजापूर, अंबेजोगाई, माहूर जोडणार शक्तिपीठ महामार्ग
Latest Marathi News पणजी होणार भारतातील पहिले एलपीजी मुक्त शहर Brought to You By : Bharat Live News Media.