राम मंदिराच्या उभारणीला धर्माशी जोडू नका- अमित शहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘राम हे भारताचे प्राण आहेत, २२ जानेवारी हा ५०० वर्षांच्या संघर्षाच्या समाप्तीचा दिवस आहे. हा दिवस कोट्यवधी भक्तांच्या आशा, आकांक्षा आणि सिद्धीचा दिवस आहे’, असे गृहमंत्री अमित शहा यांना शुक्रवारी म्हटले. अयोध्येतील राममंदिराचे ऐतिहासिक बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरील चर्चेवर आज (दि.१०) ते लोकसभेत बोलत होते. (Amit Shah On Ram Mandir) २२ … The post राम मंदिराच्या उभारणीला धर्माशी जोडू नका- अमित शहा appeared first on पुढारी.

राम मंदिराच्या उभारणीला धर्माशी जोडू नका- अमित शहा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘राम हे भारताचे प्राण आहेत, २२ जानेवारी हा ५०० वर्षांच्या संघर्षाच्या समाप्तीचा दिवस आहे. हा दिवस कोट्यवधी भक्तांच्या आशा, आकांक्षा आणि सिद्धीचा दिवस आहे’, असे गृहमंत्री अमित शहा यांना शुक्रवारी म्हटले. अयोध्येतील राममंदिराचे ऐतिहासिक बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरील चर्चेवर आज (दि.१०) ते लोकसभेत बोलत होते. (Amit Shah On Ram Mandir)
२२ जानेवारी हा संघर्ष आणि १५२८ मध्ये सुरू झालेल्या चळवळीचा शेवट आहे. १५२८ मध्ये सुरू झालेला न्यायाचा लढा याच दिवशी संपला. ५०० वर्षानंतर अन्यायावविरोधाची लढाई आता संपली. 22 जानेवारी हा दिवस हजारो वर्षांपासून ऐतिहासिक बनला आहे. ज्यांना इतिहास आणि ऐतिहासिक क्षण ओळखता येत नाहीत ते आपले अस्तित्व गमावून बसतात, अशा शब्दांत अमित शहा यांना विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. (Amit Shah On Ram Mandir)
…त्यांना देश कळलाच नाही
22 जानेवारी ही महान भारताची सुरुवात होती. जे लोक भगवान राम नसलेल्या देशाची कल्पना करतात त्यांना आपला देश नीट माहित नाही. ते लोक वसाहतवादांच्या दिवसांचे प्रतिनिधित्व करतात, असा आरोपही अमित शहा यांनी राम मंदिर प्रतिष्ठापनेला विरोधी करणाऱ्या पक्षांवर केला. (Amit Shah On Ram Mandir)
Amit Shah On Ram Mandir: राम व्यक्ती नाही, प्रतिक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले, आज मला माझ्या भावना आणि देशातील जनतेचा आवाज या सभागृहासमोर मांडायचा आहे. जी न्यायालयीन कागदपत्रांमध्ये वर्षानुवर्षे दफन झाली होती. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्याला आवाज आणि अभिव्यक्तीही मिळाली. देशाला भक्ती आंदोलनाची परंपरा आहे. राम व्यक्ती नाही, प्रतिक आहे. भारतीय संस्कृती आणि रामायण वेगळे पाहिले जाऊ शकत नाही. अनेक भाषांमध्ये, अनेक प्रांतांमध्ये आणि अनेक धर्मांमध्ये रामायणाचा उल्लेख केला आहे, रामायण अनुवादित केले आहे आणि रामायणाच्या परंपरांवर आधारित आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर टीका करणे चुकीचे आहे, असे म्हणत राम मंदिर उभारणीची कोणत्या धर्मासोबत तुलना करू नये, असा सल्लादेखील शहा यांनी यावेळी विरोधकांना दिला.
पीएम मोदींवर आम्हाला गर्व
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात, “राम मंदिर आंदोलनाकडे दुर्लक्ष करून या देशाचा इतिहास कोणीही वाचू शकत नाही. 1528 पासून प्रत्येक पिढीने हे आंदोलन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाहिले आहे. हे प्रकरण बरेच दिवस अडकून राहिले. मोदी सरकारच्या काळात स्वप्न पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत, याचा आम्हाला गर्व आहे, असेही अमित शहा म्हणाले.

HM Shri @AmitShah on the historic construction & consecration of Ram Mandir in Ayodhya in Lok Sabha. https://t.co/XT5Q6pYbwI
— BJP (@BJP4India) February 10, 2024

राम मंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयाचा निर्णय आला, तेव्हा या देशात रक्तपात होईल, दंगली होतील, असा अंदाज अनेकजण बांधत होते. पण आज मला या सभागृहात सांगायचे आहे की हे भाजपचे सरकार आहे, नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत. मोदीजींच्या दूरदर्शी विचारसरणीने न्यायालयाच्या निर्णयाचे विजय-पराजयाऐवजी सर्वांना मान्य असलेल्या न्यायालयीन आदेशात रूपांतरित करण्याचे काम केले.
1990 मध्ये या आंदोलनाला गती मिळण्यापूर्वीच भाजपने देशातील जनतेला दिलेले हे वचन होते. राम मंदिराच्या उभारणीला धर्माशी जोडू नये, देशाच्या चैतन्याच्या पुनर्जागरणाची ही चळवळ आहे, असा ठराव आम्ही पालमपूर कार्यकारिणीत संमत केला होता. या लढ्यात अनेक राजे, संत, निहंग, विविध संघटना, कायदेतज्ज्ञ यांचे योगदान आहे. 1528 ते 22 जानेवारी 2024 या काळात या लढाईत सहभागी झालेल्या सर्व शूरवीरांचे आज मला विनम्र स्मरण आहे. असेही मंत्री अमित शहा म्हणाले.
हेही वाचा:

दिल्लीतील नवसाक्षरता मेळाव्यात महाराष्ट्राचा सहभाग ठरला लक्षवेधी
लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात CAA लागू करणार : अमित शहांची मोठी घोषणा
“तुम्‍ही अशा प्रकारची भाषा वापरु नका” : राज्‍यसभा सभापतींनी खर्गेंना सुनावले

 
Latest Marathi News राम मंदिराच्या उभारणीला धर्माशी जोडू नका- अमित शहा Brought to You By : Bharat Live News Media.