‘मी बाबर, जिना, औरंगजेबचा प्रवक्ता आहे का ?’ : ओवेसींचा केंद्रावर हल्‍लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  “भारताचे नागरिक होण्यासाठी मुस्लिमांना नेहमीच मोठी किंमत मोजावी लागली आहे. मी बाबर, औरंगजेब किंवा जिनांचा प्रवक्ता आहे का?, असा सवाल करत मी मर्यादा पुरुषोत्तम रामचा आदर करतो; पण माझे लोक नथुराम गोडसेचाही तिरस्कार करतील, अशा शब्‍दांमध्‍ये आज (दि.१०) ‘एआयएमएआय’ खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. अयोध्‍येत राम मंदिराची उभारणी आणि … The post ‘मी बाबर, जिना, औरंगजेबचा प्रवक्ता आहे का ?’ : ओवेसींचा केंद्रावर हल्‍लाबोल appeared first on पुढारी.
‘मी बाबर, जिना, औरंगजेबचा प्रवक्ता आहे का ?’ : ओवेसींचा केंद्रावर हल्‍लाबोल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क :  “भारताचे नागरिक होण्यासाठी मुस्लिमांना नेहमीच मोठी किंमत मोजावी लागली आहे. मी बाबर, औरंगजेब किंवा जिनांचा प्रवक्ता आहे का?, असा सवाल करत मी मर्यादा पुरुषोत्तम रामचा आदर करतो; पण माझे लोक नथुराम गोडसेचाही तिरस्कार करतील, अशा शब्‍दांमध्‍ये आज (दि.१०) ‘एआयएमएआय’ खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. अयोध्‍येत राम मंदिराची उभारणी आणि प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यानिमित्त लोकसभेत आभार प्रस्तावावर ते बोलत होते.
यावेळी ओवेसी म्ह‍णाले ,”मोदी सरकार हे एका धर्माचे सरकार आहे की, देशातील सर्व धर्मांचे पालन करणारे सरकार आहे?. माझा विश्वास आहे की या देशात कोणताही धर्म नाही. 22 जानेवारीचा संदेश देऊन या सरकारला एका धर्माचा दुसऱ्या धर्माच्या अनुयायांवर विजय झाल्याचे दाखवायचे आहे का? राज्यघटना ही परवानगी देते का?.”
देशातील मुस्लिमांना नेहमीच मोठी किंमत मोजावी लागली
१९४९ मध्‍ये आमची फसवणूक झाली. यानंतर १९८६, १९९२ मध्‍येही आमची फसवणूक झाली. 2019 मध्येही या लोकसभेत आमची फसवणूक झाली. भारताचे नागरिक होण्यासाठी मुस्लिमांना नेहमीच मोठी किंमत मोजावी लागली.  मी मर्यादा पुरुषोत्तम रामचा आदर करतो, पण माझे लोक नथुराम गोडसेचाही तिरस्कार करतील, असेही ते म्हणाले.
AIMIM Chief Asaduddin Owaisi : ‘मी माझी ओळख अबाधित ठेवणार’
ओवेसी बोलत असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सवाल केला की, तुम्‍ही बाबरला आक्रमक मानतात की नाही? यावर ओवेसी यांनी उलटा प्रश्न विचारत ‘तुम्ही पुष्यमित्र शुंगाला काय मानता?, मी माझी ओळख अबाधित ठेवणार आहे. भाजपला पाहिजे ते काम मी करणार नाही. मी भारतीय राज्‍यघटनेच्‍या चौकटीत राहूनच काम करेन, असेही ते म्‍हणाले.

#WATCH | During the discussion on the construction of the historic Ram Temple and Pran Pratishta begins in Lok Sabha, AIMIM MP Asaduddin Owaisi says “I want to ask if Modi Govt is the government of a particular community, religion or the government of the entire country? Does GoI… pic.twitter.com/cU6tS1WIxu
— ANI (@ANI) February 10, 2024

हेही वाचा : 

“तुम्‍ही अशा प्रकारची भाषा वापरु नका” : राज्‍यसभा सभापतींनी खर्गेंना सुनावले
PM Lunch With MPs: PM मोदींनी भाजपसह, विरोधी पक्षातील खासदारांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला

 
Latest Marathi News ‘मी बाबर, जिना, औरंगजेबचा प्रवक्ता आहे का ?’ : ओवेसींचा केंद्रावर हल्‍लाबोल Brought to You By : Bharat Live News Media.