काळाच्या ओघात हुरडा पार्टीची लगबग थंडावलेलीच !

बावडा : पुढारी वृत्तसेवा :  पूर्वीच्या काळी हुरडा पार्टी म्हटली, की ग्रामीण भागातील जणू काही एक उत्सवच होता. मात्र, गेल्या दोन दशकांपासून बदलत्या काळाच्या ओघात रब्बी हंगामातील हुरडा पार्टीची लगबग जवळपास थंडावल्याचे चित्र दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यात सध्या तुरळक प्रमाणावर का होईना उत्साही शेतकर्‍यांकडून हुरडा पार्टीचे आयोजन केले जात आहे. पूर्वीच्या काळी हुरडा पार्टी … The post काळाच्या ओघात हुरडा पार्टीची लगबग थंडावलेलीच ! appeared first on पुढारी.

काळाच्या ओघात हुरडा पार्टीची लगबग थंडावलेलीच !

बावडा : Bharat Live News Media वृत्तसेवा :  पूर्वीच्या काळी हुरडा पार्टी म्हटली, की ग्रामीण भागातील जणू काही एक उत्सवच होता. मात्र, गेल्या दोन दशकांपासून बदलत्या काळाच्या ओघात रब्बी हंगामातील हुरडा पार्टीची लगबग जवळपास थंडावल्याचे चित्र दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यात सध्या तुरळक प्रमाणावर का होईना उत्साही शेतकर्‍यांकडून हुरडा पार्टीचे आयोजन केले जात आहे.
पूर्वीच्या काळी हुरडा पार्टी ही सामाजिक प्रक्रियेचाच एक भाग बनली होती. तीन दशकांपूर्वी ज्वारी हे रब्बीचे मुख्य पीक असायचे. त्यामुळे ज्वारी काढणीच्या काळात एक-दीड महिना हुरडा पार्टीची मोठी धांदल उडालेली असे. मित्रमंडळी, पै-पाहुणे, शेजारी, आप्तेष्ट यांना हुरडा पार्टीसाठी आमंत्रण दिले जात असे. या हुरडा पार्टीमुळे गप्पागोष्टी होत व त्यातून सामाजिक एकोपा, एकमेकांना सहकार्याची भावना वाढीस लागत असे.
अलीकडच्या काळात ज्वारीचे क्षेत्र कमी झाल्याने तसेच धावपळीच्या युगामुळे हुरडा पार्टी लोप पावत चालली आहे. तरीही नागरिकांनी आवर्जून हुरडा पार्टीचे आयोजन करावे, त्यामुळे नव्या पिढीला ग्रामीण रूढी-परंपरा व संस्कृतीची माहिती होईल, असे मत प्रत्येक वर्षी हुरडा पार्टीचे आयोजन करणारे विजयसिंह कानगुडे व प्रतिभाताई कानगुडे या शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील शेतकरी दाम्पत्याने व्यक्त केले. त्यांनी शेटफळ हवेली येथील शेतात नुकतेच हुरडा पार्टीचे आयोजन केले होते. हुरडा पार्टीसाठी ते शेतात आवर्जून देशी दगडी व गुळभेंडी वाणाच्या ज्वारीची पेरणी करतात.
या वाणाच्या कणसाचा हुरडा चविष्ट व मऊ असतो. ज्वारीची कणसे शेणाच्या गौर्‍यांमध्ये भाजून कणसातील दाणे हाताने चोळून काढले जातात. या हुरड्यासोबत चिक्की, गूळ, खजूर, शेंगदाणा, नारळाची चटणी, दही आदी पदार्थ खाण्यासाठी ठेवले जातात. अनेकदा हरभर्‍याचे डहाळे, मक्याची कणसे देखील भाजून खाण्यास दिली जातात. एकंदरीत, ग्रामीण संस्कृतीचे वैभव असणारी हुरडा
पार्टी आवर्जून जपावयास हवी, अशी प्रतिक्रिया जुन्या पिढीतील शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत.
 
Latest Marathi News काळाच्या ओघात हुरडा पार्टीची लगबग थंडावलेलीच ! Brought to You By : Bharat Live News Media.