‘सोमेश्वर’कडून 8 लाख 91 हजार टनाचे गाळप

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने शंभर दिवसांत 8 लाख 91 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करत 10 लाख 25 हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. साखर उतार्‍यात ‘सोमेश्वर’ने बाजी मारली असून, 11.54 चा साखर उतारा राखत सोमेश्वरने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिरायती भागातील पाणीटंचाईचे सावट पाहता कारखाना प्रशासन सतर्क झाले … The post ‘सोमेश्वर’कडून 8 लाख 91 हजार टनाचे गाळप appeared first on पुढारी.

‘सोमेश्वर’कडून 8 लाख 91 हजार टनाचे गाळप

सोमेश्वरनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने शंभर दिवसांत 8 लाख 91 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करत 10 लाख 25 हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. साखर उतार्‍यात ‘सोमेश्वर’ने बाजी मारली असून, 11.54 चा साखर उतारा राखत सोमेश्वरने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिरायती भागातील पाणीटंचाईचे सावट पाहता कारखाना प्रशासन सतर्क झाले असून तातडीने या भागातील ऊस गाळपास आणला जात आहे. वाढलेल्या उन्हामुळे ऊस तोडणी मजूर पहाटेच ऊसतोड करताना दिसत आहेत. कारखान्याकडे मुबलक यंत्रणा असल्याने क्षमतेपेक्षा जास्त दैनंदिन गाळप कारखाना करत आहे. चालू वर्षी सोमेश्वरकडे अडसाली उसाचे क्षेत्र जास्त आहे. चालू वर्षी उसाच्या एकरी उत्पादनात वाढ झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे.
माळेगाव साखर साखर कारखान्याने 8 लाख 44 हजार मे.टन गाळप करत 9 लाख 55 हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. माळेगाव कारखान्याचा 10.87 साखर उतारा आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने 4 लाख 79 हजार ऊस गाळप करत 4 लाख 92 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासदांच्या उसासह गेटकेन ऊस आणण्यावर भर दिला होता मात्र यावर नियंत्रण आणत कारखाना आता सभासदांच्या उसाला प्राधान्य देत आहे. दररोज नऊ हजारापेक्षा जास्त गाळप होत आहे. सोमेश्वर कारखाना उसाचे गाळप करीत असताना कमीत कमी नुकसान, दर्जेदार साखरनिर्मिती, इतर उपपदार्थ व साखरेचा उतारा चांगला राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
विस्तारीकरण झाल्याने गाळपक्षमता वाढली आहे. ट्रक-ट्रॅक्टर, बैलगाडी, डंपिंग आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून वेळेत गाळप करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 43 हजार पाचशे एकर उसाची नोंद झाली होती. कारखान्याने चालू हंगामात 14 लाखापेक्षा जास्त मे.टन ऊस गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सभासदांच्या ऊस व खोडव्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे विस्तारीकरण फेब—ुवारी अखेरीस पूर्ण होणार असून 36 मेगावॅट क्षमतेने वीजनिर्मिती होणार आहे.
Latest Marathi News ‘सोमेश्वर’कडून 8 लाख 91 हजार टनाचे गाळप Brought to You By : Bharat Live News Media.