कोल्हापूर: शित्तूर वारूण येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार

शित्तूर वारूण :  शित्तूर वारूण पैकी तळीचा वाडा येथे जनावरे चारण्यासाठी गेलेल्या सारिका बबन गावडे (वय ९) हिच्यावर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना आज (दि. २०) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या वर्षातली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, सारिका गावडे ही आपली आई … The post कोल्हापूर: शित्तूर वारूण येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार appeared first on पुढारी.

कोल्हापूर: शित्तूर वारूण येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार

सतीश नांगरे

शित्तूर वारूण :  शित्तूर वारूण पैकी तळीचा वाडा येथे जनावरे चारण्यासाठी गेलेल्या सारिका बबन गावडे (वय ९) हिच्यावर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना आज (दि. २०) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या वर्षातली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, सारिका गावडे ही आपली आई गंगाबाई गावडे हिच्यासोबत घराच्या शेजारी जनावरांना चारण्यासाठी गेली होती. यावेळी झुडुपाआड दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक सारिका गावडे हिच्यावर हल्ला केला. तिच्या आईने व शिवारात असलेल्या एका दुसऱ्या मुलाने तिला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत बिबट्याने तिच्या नरडीचा घोट घेतल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर बिबट्याच्या हल्ल्याच्या तीव्र जखमा दिसून येत होत्या. ही घटना परीसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटना स्थळावर प्रचंड गर्दी झाली होती. घटनास्थळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा अक्षरशा हृदय पिळवटून टाकणारा होता.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले हे प्रत्यक्षात घटनास्थळी उपस्थित राहीले होते. यावेळी त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा चांगलाच भडिमार केला. लोकांच्या एकाही प्रश्नाला वन अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.
 
The post कोल्हापूर: शित्तूर वारूण येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार appeared first on पुढारी.

शित्तूर वारूण :  शित्तूर वारूण पैकी तळीचा वाडा येथे जनावरे चारण्यासाठी गेलेल्या सारिका बबन गावडे (वय ९) हिच्यावर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना आज (दि. २०) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या वर्षातली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, सारिका गावडे ही आपली आई …

The post कोल्हापूर: शित्तूर वारूण येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार appeared first on पुढारी.

Go to Source