गर्भावस्थेतील अस्थमा

गर्भावस्थेत महिला व होणार्‍या बाळासाठी अस्थमा हा आजार खूप त्रासदायक ठरू शकतो. त्यासाठी महिलांनी गर्भावस्थेत तपासणी करताना अस्थमा आहे किंवा नाही याचे ही निदान करणे आवश्यक आहे. अस्थमावर वेळीच उपचार होणे जरुरीचे आहे. नाही तर त्या महिलेसाठी व होणार्‍या बाळासाठी ते धोकादायक असते. अस्थमा झालेल्या गर्भवतींनी धूळ व सिगारेटच्या धुरापासून दूर राहिले पाहिजे. कारण, त्यापासून … The post गर्भावस्थेतील अस्थमा appeared first on पुढारी.

गर्भावस्थेतील अस्थमा

गर्भावस्थेत महिला व होणार्‍या बाळासाठी अस्थमा हा आजार खूप त्रासदायक ठरू शकतो. त्यासाठी महिलांनी गर्भावस्थेत तपासणी करताना अस्थमा आहे किंवा नाही याचे ही निदान करणे आवश्यक आहे. अस्थमावर वेळीच उपचार होणे जरुरीचे आहे. नाही तर त्या महिलेसाठी व होणार्‍या बाळासाठी ते धोकादायक असते. अस्थमा झालेल्या गर्भवतींनी धूळ व सिगारेटच्या धुरापासून दूर राहिले पाहिजे. कारण, त्यापासून त्यांच्यासह पोटातील बाळाचा जीव गुदमरतो. ( Asthma in Pregnancy )
संबंधित बातम्या 

Pregnancy Diet : कसा असावा गर्भारपणातील आहार-विहार?
चीनमध्‍ये वाढलाय ‘Virtual Pregnancy’चा ट्रेंड, काय आहे यामागील कारण ?
Pregnancy Tips : गरोदरपणात त्वचेला खाज येतेय? जाणून घ्या कारणे आणि उपाय

गर्भधारणा झाल्यानंतर लागलीच महिलांनी अस्थमाचे निदान करून त्यावर उपचार सुरू केले, तर त्याचा होणार्‍या बाळाच्या आरोग्यावर काहीही परिणाम होणार नाही; मात्र वेळीच उपचार केला नाही, तर त्याचा गंभीर परिणाम होणार्‍या बाळामध्ये दिसून येतो. गर्भामध्ये वाढ होत असलेल्या बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण एकदम कमी होते. त्यामुळे बाळाची वाढ होणे थांबते. गर्भवाढीच्या द़ृष्टीने गर्भवती महिलेला अस्थमावर उपचार करून बाळाला ऑक्सिजनची पूर्तता करणे गरजेचे असते.
गर्भावस्थेच्या द्वितीय, तृतीय महिन्यात अस्थमा वाढण्याला सुरुवात होते; मात्र स्त्रीला दोन—तीन आठवड्यांनंतर त्याची लक्षणे जाणवतात. तेव्हापासून स्त्रियांनी त्यावर उपचार सुरू केले पाहिजे. कारण, प्रसूतीपर्यंत नियंत्रणात आणता येऊ शकते. अस्थमाग्रस्त महिला बाळाला दूध पाजवण्यास तयार नसतात. त्यांना भीती असते की, त्यांच्या दुधाद्वारे बाळालाही अस्थमा होईल; मात्र हा गैरसमज त्यांनी आधी मनातून काढून टाकला पाहिजे. ( Asthma in Pregnancy )
The post गर्भावस्थेतील अस्थमा appeared first on Bharat Live News Media.