सांगली : मनोज जरांगे यांच्या रॅलीत चोऱ्या करणारी टोळी जेरबंद: विटा पोलिसांची कारवाई
विटा: पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे- पाटील यांच्या १७ नोव्हेंबररोजी झालेल्या रॅलीतील गर्दीचा फायदा घेवून चोऱ्या करणाऱ्या मराठवाड्यातील टोळीला विटा पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार २०० रुपये रोख रक्कम हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. या प्रकरणी नागेवाडीचे सतीश निकम यांनी फिर्याद दिली होती.
सुरज उध्दव पवार (वय २७), रमाकांत आनंदा कांबळे (वय ३६), आकाश साहेबराव वाघमारे (वय २४), राजेश विठ्ठल शाहीर (वय ३४), अविनाश लालासाहेब कांबळे (वय २७), दत्ता लालासाहेब कांबळे (वय २८), अक्षय शिवाजी सनमुखराव (वय ३४), विलास लक्ष्मण शिंदे (वय २६, रा. सर्व राजीवनगर, जि.लातूर) आणि बिलाल गुलाबनबी खान (वय ५४ रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी त्यांची अटक केलेल्यांची नावे आहेत.
मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा विटा शहरात १७ नोव्हेंबर रोजी झाली. तत्पूर्वी माहुली नागेवाडी घानवड गार्डी येथे त्यांची रॅली झाली. तसेच यानंतर शिरगाव आणि तासगाव येथेही मनोज जरांगे पाटील यांची रॅली झाली. या वेळी जमलेल्या गर्दीचा फायदा घेवून काही लोकांच्या पाकिटा तील, खिशातील, पर्स मधील पैसे चोरीला गेल्याच्या तक्रार आल्या होत्या.
सांगलीचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक बसवराज तेली, विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड यांनी तपास सुरू केला. अंमलदार उत्तम माळी, प्रमोद साखरपे, अमोल कराळे, महेश देशमुख, हेमंत तांबेवाघ, अक्षय जगदाळे पेट्रोलिंग करत होते. यावेळी विटा बसस्थानक परिसरात ७ ते ८ जण हे संशयितरित्या फिरत होते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
दरम्यान, अटक केलेले आठ संशयित रेकॉर्डवरील असून त्यांच्याकडून विटा पोलीस ठाण्यातील दोन आणि तासगाव पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे विटा गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणलेले आहेत.
हेही वाचा
ऊस दरासाठी सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको
सांगली : जतमध्ये सोळा लाखाच्या साहित्यांची परस्पर विक्री; कामगारावर गुन्हा
सांगली : अपघातात तरुणाचे शिर धडावेगळे
The post सांगली : मनोज जरांगे यांच्या रॅलीत चोऱ्या करणारी टोळी जेरबंद: विटा पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.
विटा: पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे- पाटील यांच्या १७ नोव्हेंबररोजी झालेल्या रॅलीतील गर्दीचा फायदा घेवून चोऱ्या करणाऱ्या मराठवाड्यातील टोळीला विटा पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार २०० रुपये रोख रक्कम हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. या प्रकरणी नागेवाडीचे सतीश निकम यांनी फिर्याद …
The post सांगली : मनोज जरांगे यांच्या रॅलीत चोऱ्या करणारी टोळी जेरबंद: विटा पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.