हान की बडीव! वॉर्नरच्या T20 अर्धशतकांचे ‘शतक’, रचले एकाच सामन्यात 3 विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner World Record : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात नवा किर्तीमान रचला. शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना त्याच्या टी20 करिअरमधील 100वा सामना ठरला. या सामन्यात त्याने केवळ 36 चेंडूत 70 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला असून … The post हान की बडीव! वॉर्नरच्या T20 अर्धशतकांचे ‘शतक’, रचले एकाच सामन्यात 3 विक्रम appeared first on पुढारी.

हान की बडीव! वॉर्नरच्या T20 अर्धशतकांचे ‘शतक’, रचले एकाच सामन्यात 3 विक्रम

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : David Warner World Record : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात नवा किर्तीमान रचला. शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना त्याच्या टी20 करिअरमधील 100वा सामना ठरला. या सामन्यात त्याने केवळ 36 चेंडूत 70 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला असून 100व्या कसोटी, 100व्या वनडे आणि 100व्या टी-20 सामन्यात 50+ धावा करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
वॉर्नरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द (David Warner World Record)
वॉर्नरच्या आधी न्यूझीलंडचा रॉस टेलर आणि भारताचा विराट कोहली यांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये किमान 100 सामने खेळले आहेत. टेलरने आपल्या कारकिर्दीत 112 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर दुसरीकडे, कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 113 कसोटी, 292 एकदिवसीय आणि 117 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आता या दोन दिग्गजांनंतर वॉर्नरचे नावही या यादीत सामील झाले आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 112 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 100 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 8786, 6932, 2964 धावा केल्या आहेत. वॉर्नरने 176 आयपीएल सामनेही खेळले आहेत. ज्यात त्याच्या बॅटमधून 6397 धावा आल्या आहेत.
भारताविरुद्ध 100 वा एकदिवसीय
वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळला. त्या सामन्यात त्याने 255 चेंडूत 200 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने भारताविरुद्ध 100 वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ज्यात वॉर्नरने 119 चेंडूत 124 धावा केल्या. आता त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून त्यात 70 धावांची वादळी खेळी साकारली. वॉर्नर हा कसोटी आणि एकदिवसीय फॉर्मेटमधून निवृत्ती झाला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 विकेट गमावत 213 धावा केल्या. वॉर्नरशिवाय जोश इंग्लिश आणि टिम डेव्हिडसारख्या फलंदाजांनी देखील उपयुक्त योगदान दिले. इंग्लिशने 25 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. वॉर्नर-इंग्लिश यांच्यात 8 षटकात 93 धावांची भागीदारी झाली. यानंतर, शेवटच्या षटकांमध्ये टीम डेव्हिडने 17 चेंडूत 37 धावा फटकावर शानदार खेळी केली. त्याने आपल्या इनिंगमध्ये 4 चौकार आणि 2 षटकार मारले. विंडिजकडून आंद्रे रसेलने 3 तर अल्झारी जोसेफने 2 बळी घेतले. जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांना 1-1 विकेट मिळाली.

David Warner is off to a flyer in the #AUSvWI T20I!
Watch live on Kayo or Fox Cricket. pic.twitter.com/xVIjlD2xlL
— cricket.com.au (@cricketcomau) February 9, 2024

The post हान की बडीव! वॉर्नरच्या T20 अर्धशतकांचे ‘शतक’, रचले एकाच सामन्यात 3 विक्रम appeared first on Bharat Live News Media.