निवडणुक निकाल ‘इफेक्ट’; इम्रान खान यांना जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानमधील ‘डॉन’ वृत्तपत्राच्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या समर्थक उमेदवारांनी ९९ जागांवर विजय मिळविला आहे. यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १२ केसेसमध्ये जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने … The post निवडणुक निकाल ‘इफेक्ट’; इम्रान खान यांना जामीन मंजूर appeared first on पुढारी.
निवडणुक निकाल ‘इफेक्ट’; इम्रान खान यांना जामीन मंजूर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानमधील ‘डॉन’ वृत्तपत्राच्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या समर्थक उमेदवारांनी ९९ जागांवर विजय मिळविला आहे. यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १२ केसेसमध्ये जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Imran Khan Bail)
पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना गेल्या वर्षी मे महिन्यात लष्करी प्रतिष्ठानांवर झालेल्या हल्ल्यासंबंधी गुन्हा दाखल केला होता. या घटनेतील १२ प्रकरणांमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Imran Khan Bail)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पाकिस्तान ‘तेहरीक-ए-इन्साफ’च्या (पीटीआय) अनेक नेत्यांवर ९ मे, २०२३ रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणातील अनेक खटल्यांमध्ये खटला चालवला जात आहे. या हिंसाचार प्रकरणात पाकिस्तानमधील प्रमुख लष्करी प्रतिष्ठानांना नुकसान पोहोचले होते, असे देखील वृत्तात म्हटले आहे. (Imran Khan Bail)
काय आहे पाकिस्तानातील लष्करी हिंसाचार प्रकरण?
इस्लामाबादमध्ये निमलष्करी रेंजर्सनी इम्रान खानला अटक केल्यानंतर निदर्शने सुरू झाली. त्यानंतरच्या हिंसाचारात रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयासह २० हून अधिक लष्करी प्रतिष्ठान आणि राज्य इमारतींचे नुकसान झाले. दरम्यान कॉर्प्स कमांडर लाहोर, अस्करी टॉवर, शादमान पोलीस स्टेशन यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला तर खान यांच्या जमान पार्क निवासस्थानाबाहेरील पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या हिंसाचार प्रकरणावरून पाकिस्तानातील पीटीआय प्रमुख, माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर १२ खटले दाखल करण्यात आले होते. दरम्यान पाकिस्तानातील  दहशतवादी न्यायालयाने त्यांचा याप्रकरणी जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे.
हेही वाचा:

Imran Khan : इम्रान खान यांना भर चौकात फासावर लटकवायला हवे होते; पाकच्या विरोधी पक्षनेत्याचे मत
Imran Khan Vs Asim Munir : पाकिस्तान पोळतोय माजी पंतप्रधान-लष्कर प्रमुख वादात; वादाचे केंद्र बुशरा बिवी!
Imran Khan Arrest : इम्रान खान समर्थक आक्रमक; लष्करासह ‘आयएसआय’ मुख्यालयावर हल्ला, नागरिकांवर गोळीबार

Latest Marathi News निवडणुक निकाल ‘इफेक्ट’; इम्रान खान यांना जामीन मंजूर Brought to You By : Bharat Live News Media.