मीरा देवस्थळेची ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिका लवकरच

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनची नवीन मालिका ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ ही विचार प्रवर्तक मालिका आहे. या मालिकेत नंदिनीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. (Meera Deosthale) तिच्यात परंपरेची मुळे खोलवर रुजलेली असली तरी ती महिलांच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मान्यतांवर आक्षेप घेणारी खंबीर स्त्री आहे. ही अभूतपूर्व मालिका समाजाला त्रस्त करणाऱ्या हुंडा प्रथेवर प्रकाशझोत टाकते. त्यात नंदिनी एक शक्तीशाली मागणी करते – “मुझे मेरा दहेज वापस चाहिए” (मला माझा हुंडा परत हवा आहे). ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिकेच्या केंद्रस्थानी मीरा देवस्थळेकडून साकारली जाणारी नंदिनीची भूमिका आहे. तिची व्यक्तिरेखा महिलांच्या आत्मसन्मानाला अपमानित करणाऱ्या कित्येक शतके जुन्या मान्यतांना आव्हान देणाऱ्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. (Meera Deosthale)
संबंधित बातम्या –
‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी दिसणार नव्या रुपात
सातव्या मुलीची सातवी मुलगी : नेत्रा, इंद्राणी-रूपालीला दिसणार त्रिनयना देवीचा दिव्यप्रकाश
All India Rank Trailer : ऑल इंडिया रँकचा ट्रेलर, IIT ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अविरत संघर्ष
गुजरातमध्ये घडणाऱ्या या मालिकेत नंदिनी ही मामा-मामी आणि तिचा भाऊ मीतसोबत राहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिच्याकडे स्वत:ची नैतिक मूल्ये आहेत आणि ती आपल्या वडीलधाऱ्यांचा सन्मानही करते. मात्र जेव्हा केव्हा ती चुकीच्या गोष्टी घडताना पाहते तेव्हा त्यावर भूमिका घेण्यावर तिचा विश्वास आहे.
आपल्या व्यक्तिरेखेबाबत बोलताना मीरा देवस्थळे म्हणाली की, “मला वाटते की आवर्जून सांगितली जावी, अशी ही कथा आहे. आपल्या समाजात आजही अस्तित्वात असलेल्या कु-रितींबाबत बहुसंख्य लोकांनी प्रश्न विचारणे गरजेचे आहे. असे मजबूत उद्दिष्ट्य असलेली भूमिका साकारण्याबाबत मी खूप उत्सुक झालेले आहे. मला वाटते की लेकी या प्रेम करण्यासाठी असतात, हुंड्याच्या नावाखाली वस्तुकरण करण्यासाठी नव्हे. मालिकेतील माझ्या भूमिकेच्या माध्यमातून मला ही छाप पाडायची खूप इच्छा आहे. आपल्या लग्नाच्या वेळी हुंडा देण्यात आल्याचे नंदिनीला माहितच नव्हते. मात्र ही मालिका तिच्या साहसी प्रवासावर प्रकाशझोत टाकणार आहे. वैवाहिक आयुष्यात सुखी असतानाही ती आपल्या सासू-सासऱ्यांविरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घेते अन् म्हणते, “मुझे मेरा दहेज वापस चाहिए” (मला माझा हुंडा परत हवा आहे).
‘कुछ रीत जगत की ऐसी है’ ही मालिका १९ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. सोमवार ते शनिवारी रात्री साडे आठ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारण होईल.
View this post on Instagram
A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)
View this post on Instagram
A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)
View this post on Instagram
A post shared by Meera Deosthale (@meera.deosthale)
Meera Deosthale
Latest Marathi News मीरा देवस्थळेची ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिका लवकरच Brought to You By : Bharat Live News Media.
