WTC Points Table मध्ये टीम इंडियाची मोठी झेप

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : WTC Points Table : विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. या विजयानंतर भारताने गुणतालिकेत मोठी झेप घेत दुसरे स्थान मिळवले आहे. या बदलामुळे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघांची घसरण झाली आहे. हैदराबाद कसोटी गमावल्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहचली होती, पण विशाखापट्टणममध्ये मैदान मारल्यानंतर रोहित सेनेने पुन्हा गुणतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.
Latest Marathi News WTC Points Table मध्ये टीम इंडियाची मोठी झेप Brought to You By : Bharat Live News Media.
