
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या मागणीनुसार सगेसोयऱ्यांना ही प्रमाणपत्र देण्य़ाचा अध्यादेश काढला आहे. त्याची प्रत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे -पाटील यांना दिली आहे. एखादा अध्यादेश काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया राज्य सरकार पूर्ण करणार आहे, त्यामुळे जरांगे यांना पुन्हा उपोषण करण्याची गरज नाही, असे मत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर देसाई पत्रकारांशी बोलत होते. Shambhuraj Desai
देसाई म्हणाले की, जरांगे यांनी वेळोवेळी मुख्यंत्र्यांवर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत निश्चित पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. या अध्यादेशाबाबत निर्णय अधिवेशनात घेतला जाईल, मराठा आरक्षणाबाबत सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिले असताना जरांगे यांनी पुन्हा-पुन्हा उपोषण करण्याची भूमिका घेऊ नये, अशी विनंती देसाई यांनी केली. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्ंमक आहे. जो शब्द, आश्वासन दिले आहे, त्य़ाची पूर्तता सरकारकडून केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Shambhuraj Desai
राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज झालेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी चर्चेत भागही घेतला, असे भुजबळांच्या राजीनामा विधानावर देसाई यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळात २० प्रश्न उपस्थित केले होते.त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे देसाई यांनी सांगितले.
हेही वाचा
मनोज जरांगे यांचं राजकीय आरक्षणाबाबत सूचक भाष्य
Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा इतिहास आणि घटनाक्रम
हरीभाऊ राठोड म्हणतात,मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, पण तहामध्ये हरले !
Latest Marathi News ‘सर्व प्रश्न सुटल्याने मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण करू नये’ Brought to You By : Bharat Live News Media.
