नाशिकच्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण

इंदिरानगर Bharat Live News Media वृत्तसेवा ; नाशिकचे सुपुत्र व भारतीय लष्करातील वीर जवान हेमंत यशवंतराव देवरे हे भारत चीन सीमेवर कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत. त्यांच्या शहीद होण्याची बातमी कळताच जिल्हाभरात शोककळा पसरली आहे.
शहीद हेमंत देवरे हे नाशिकच्या इंदिरानगर भागातील, नागरे मळा येथील रहिवाशी होत. त्यांचे पार्थिव उद्या मंगळवार (दि. ६) दुपारी २ वाजता नाशिक इंदिरानगर, नागरे मळा येथे आणण्यात येईल. शहीद जवान हेमंत देवरे हे येथील एसीपी (ACP) कार्यालय येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस शिपाई वंदना देवरे यांचे पती आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी X पोस्ट करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी व माझा संपूर्ण परिवार सहभागी असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान, आपल्या नाशिकचे सुपुत्र हेमंत यशवंतराव देवरे यांना पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी व माझा संपूर्ण परिवार सहभागी… pic.twitter.com/BJiTi8Y2Uy
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 5, 2024
Latest Marathi News नाशिकच्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण Brought to You By : Bharat Live News Media.
