पिंपळनेर : साक्रीमध्ये तरुणांसह महिलांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश

पिंपळनेर ,जि.धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा
प्रहार जनशक्ती पक्ष (Prahar Janshakti Paksh) व प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार संघटनेमध्ये साक्री येथील शासकिय विश्रामगृहाच्या आवारात तरुण व महिलांचा मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला.
प्रहार तालुका विभाग प्रमुख, जयेश बावा व दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उमेश पाटिल, साक्री तालुका उपाध्यक्ष नाना शेलार होते तर प्रमुख अतिथी म्हणून शशीकांत अहिरराव, प्रदीप सोनवणे, युवराज मराठे, गोकुळ बेडसे, राजु भदाणे हे उपस्थित होते. (Prahar Janshakti Paksh)
यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या तरुणांमध्ये महेश नांद्रे, राहुल नांद्रे, पवन राजपूत, उमेश पाटील, रवी सुळ, अतुल साळुंखे, किरण सुळ, कैलास कोळेकर, संदीप वाघमोडे, अहमद खान पठाण, कैलास गोयकर, उत्तम गोयकर तसेच महिलांमध्ये भुराबाई भदाणे, सुनंदा शेलार,अनिता अहिरे, सुक्रीबाई अहिरे, उज्वला चित्ते, गजाबाई वाघमोडे त्याच बरोबर अनेक महिलांनी प्रवेश (Prahar Janshakti Paksh) केला.
जयेश बावा यांनी प्रहार जनशक्ती पक्ष हा सेवा करणारा पक्ष असुन जास्तीत जास्त तरुणांनी प्रहार मध्ये येऊन सेवा करण्याची संधी स्वीकारावी असे आवाहन यावेळी केले. महेश नांद्रे यांनी संघटनेचे महत्व पटून दिले. उमेश पाटील यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहित केले तसेच नाना शेलार यांनी आभार मानले. यावेळी उपस्थीत सागर बावा, भीला कोळेकर, राजू कोरडकर, हरिभाऊ बोरसे, सोमनाथ विसपुते, पांडुरंग सोनवणे, मुनीलाल चौरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Prahar Janshakti Paksh)
हेही वाचा:
Nashik | दिव्यांग बांधवांसाठी माझ्यावर २५० गुन्हे दाखल – आमदार बच्चू कडू
ECI On Childrens : प्रचार प्रक्रियेत मुलांचा वापर करू नका : निवडणूक आयाेगाची सूचना
Pune : ‘गो-ग्रीन’चा वापर वाढतोय
Latest Marathi News पिंपळनेर : साक्रीमध्ये तरुणांसह महिलांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.
