कठाणी नदीच्या पुलावर अपघात; ट्रकच्या धडकेत दूध विक्रेता ठार

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली शहरात दूध विक्री करून गावी परत जाताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने दूध विक्रेता जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहरानजीकच्या कठाणी नदीच्या पुलावर घडली. मारोती भोयर (वय ५५) रा. महादवाडी ता. गडचिरोली असे मृताचे नाव आहे. भोयर हे शेतीसह दुग्धव्यवसायही कारायचे. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी गडचिरोलीत … The post कठाणी नदीच्या पुलावर अपघात; ट्रकच्या धडकेत दूध विक्रेता ठार appeared first on पुढारी.

कठाणी नदीच्या पुलावर अपघात; ट्रकच्या धडकेत दूध विक्रेता ठार

गडचिरोली, Bharat Live News Media वृत्तसेवा : गडचिरोली शहरात दूध विक्री करून गावी परत जाताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने दूध विक्रेता जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहरानजीकच्या कठाणी नदीच्या पुलावर घडली.
मारोती भोयर (वय ५५) रा. महादवाडी ता. गडचिरोली असे मृताचे नाव आहे. भोयर हे शेतीसह दुग्धव्यवसायही कारायचे. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी गडचिरोलीत आले. ग्राहकांना दूध वाटप केल्यानंतर गुरांसाठी पशुखाद्य खरेदी केले. त्यानंतर खाद्य आणि दुधाच्या किटल्या घेऊन ते मोटारसायकलने गावी परत जात होते. आरमोरी मार्गावरील कठाणी नदीच्या पुलावर आले असता पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यानंतर मारोती भोयर हे खाली कोसळले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. घटनेनंतर चालकाने ट्रक तेथेच ठेवून पलायन केले. पोलीस त्याचा शोध घेत असून ट्रक ताब्यात घेतला आहे.
Latest Marathi News कठाणी नदीच्या पुलावर अपघात; ट्रकच्या धडकेत दूध विक्रेता ठार Brought to You By : Bharat Live News Media.